शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या असताना आज कोर्टात सुनावणीची तारीख आलेली आहे. त्याशिवाय ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. यावेळी दोन्ही आघाडीतील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतला तर कित्येक बंडखोर उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे राज्यातील अनेक मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
Live Update : हिना गावित यांचा भाजपला रामराम
हिना गावित यांचा भाजपला रामराम
हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपला राजीनामा पाठवला आहे.
Live Update : अजित पवार गटाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध करण्यात येणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध करण्यात येणार
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार
सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचे आश्वासन
Live Update : सलमान खानला बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी
#BREAKING | Salman Khan gets new threat message again allegedly from Bishnoi gang#SalmanKhan
— NDTV (@ndtv) November 5, 2024
Live Update : आज राज ठाकरे नागपुरात
सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळावर राज ठाकरेंचं मनसैनिकांतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.
हॉटेल ब्ल्यू मध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि यवतमाळकडे रवाना होतील. आज यवतमाळ येथे सभा आहे
Live Update : माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया केल्याने माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Live Update : आदित्य ठाकरे यांचा आज मुंबईत पहिला रोड शो
महाविकास आघाडीच्या वडाळा विधानसभेच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांचा मुंबईत रोड शो आहे. आज सायंकाळी ६ वाजता रोड शोला सुरुवात होईल.
उद्धव ठाकरे यांच्या सभांना आजपासून सुरवात झाली असून दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील आज पासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.