- मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये स्पर्धा आहे
- शिंदे गटाचे उमेदवार सुमित वजाळे मातोश्रीजवळ प्रचारासाठी पोहोचले होते
- सुमित वजाळे यांनी मतदारांना भेटण्यासाठी मातोश्री परिसरात आल्याचे सांगितले
मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने-सामने ठाकले आहे. उमेदवार सध्या घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर देत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांना मानस आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या घाम गाळत असल्याचं दिसून येत आहेत. अशात एक अशी घटना समोर आली आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार थेट मातोश्रीवर प्रचारासाठी पोहोचला होता.
वांद्रे इथं प्रभाग क्रमांक 93 आहे. या प्रभागात मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. ते या वार्डसाठी मतदान ही करणार आहेत. या वार्डातून शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार ही रिंगणात उतरवला आहे. शिंदे गटाकडून सुमित वजाळे हे निवडणूक लढत आहेत. ते सध्या वार्डात प्रचार करत आहेत. ते आज गुरूवारी प्रचारासाठी थेट कलानगरमध्ये पोहोचले. कलानगरमध्ये मातोश्री हे उद्धव ठाकरेंचे निवासस्थान आहे. ते कलानगरमध्ये जात असतानाच गेटवर त्यांना पोलीसांनी अडवले.
नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?
कुठे जायचे आहे अशी त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण सुमित वजाळे आहोत. आपण या प्रभागातले उमेदवार आहोत. त्यामुळे इथे प्रचारासाठी आले आहोत. आपल्या मतदारांना भेटण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्यांना भेटायचे आहे असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काही मतदारांना भेटाचे आहे असं ही त्यांनी सांगितलं. त्यानंतर पोलीसांनी त्यांना दुसऱ्या गेटमधून पाठवले. पण थेट मातोश्रीच्या दारात ते मत मागण्यासाठी गेल्याची चर्चा सगळीकडे होत आहे. शिवाय त्यांचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world