आज पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्ताने (Pandharpur Ashadhi Ekadashi) मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा पूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे या नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला पूजेचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे वडील, स्वतः मुख्यमंत्री त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे पुत्र रुद्रांश अशा शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन सलग तिसऱ्या वर्षी विठ्ठलाची आषाढीला शासकीय महापूजा केली. या महापूजेनंतर मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजा शेतकरी सुखी समाधानी होऊ दे पाऊस पडू दे...असे साकडे ...विठ्ठलाला घातले असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा
उल्हासनगरच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या बिर्ला मंदिरात आषाढी एकादशीचा उत्साह
उल्हासनगरच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज सकाळी कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपरिवार बिर्ला मंदिरात विठ्ठलाची पूजा केली. सेंच्युरी रेयॉन कंपनीने बांधलेलं हे मंदिर अनेक वर्षे जुनं असून आषाढी कार्तिकीला ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही, असे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येतात. आज पहाटे कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा आणि आरती केली. देशात सुख, समृद्धी राहावी, तसंच बळीराजावरील संकट दूर व्हावं, बळीराजा सुखी राहो अशी प्रार्थना विठुरायाला केल्याचं विश्वास गुजर म्हणाले.
नितीन गडकरी यांनी आषाढी एकादशी निमित्त घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आषाढी एकादशी निमित्त घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. राजधानी दिल्लीत आर के पुरम परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राजधानी दिल्लीत मराठी माणूस एकत्र येतो. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विठ्ठलाची पूजा केली.
डोंबिवली रेल्वे स्थानकात आषाढी एकादशीनिमित्त पांडूरंगाचं भजन
डोंबिवली रेल्वे स्थानक येथे आषाढी एकादशी निमित्त पांडूरंगाची पूजा केल्यानंतर भजन करण्यात आले. यावेळी रज्याचे सार्वजनिक मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सुरू असलेल्या भजनात देखील ते दंग झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला, राजधानी दिल्लीत आज सांकेतिक वारीचं आयोजन
आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रात सर्वत्र शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारचा उत्साह राजधानी दिल्लीतही पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत आज सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आषाढी वारी असते, त्याचप्रमाणे दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं सांकेतिक वारीचं आयोजन दरवर्षी केलं जातं.
टाळ - मृदंगाचा गजर करत, फुगड्या घालत विठ्ठल रखुमाईच्या भक्तीचा गजर करत दरवर्षी दिल्लीकर मराठी बांधव या वारीचं आयोजन करत असतात. या वारीच्या निमित्ताने अनेक शतकांचा वैभवशाली इतिहास असलेल्या पंढरपूरच्या वारीचे दर्शन दिल्लीकरांना होतं. दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरापासून ही वारी आर. के. पुरम परिसरातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जवळपास 12 किलोमीटर वारीचा मार्ग प्रवास करते. दरवर्षी हजारो दिल्लीकर मराठी नागरिक यामध्ये सहभागी होत असतात.