2 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शपथ घेतील असं सांगितलं जात आहे. कोण मुख्यमंत्री होणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहे. मात्र भाजपकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जाणार की, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे नवा चेहरा दिला जाणार याबाबत नवनवे आडाखे बांधले जात आहेत. दुसरीकडे राज्यातील अनेक भागात थंडीच्या लाटेशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतही यंदा नोव्हेंबर महिन्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. पुढील काही दिवस अशीच थंडी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
Balasaheb Thorat: ' सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झालं हा संशोधनाचा विषय: बाळासाहेब थोरात
'महाराष्ट्र म्हणून आम्ही एकमताने निवडणूक लढवली. आमचे पक्षांतर्गत वाद नव्हते. कुठल धोरण ठरवायचं त्यावर सांगोपांग चर्चा झाली. EVM बाबत निवेदन रात्री येईल. आकडेवारी वाढली त्यात अनेक संशयास्पद गोष्ट आहेत. त्या आम्ही निदर्शनाला आणून दिलं आहे. सायंकाळी 6 नंतर 75 लाख मतदान झाल हा संशोधनाचा विषय आहे,' असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.
Kailas Patil: सत्तेचा खेळ झाला असेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या: आमदार कैलास पाटील
सत्ताधाऱ्यांना पाशवी बहुमत मिळाले असुन ते सध्या मंञी, मुख्यमंत्री होण्यासाठी धावपळ करत आहेत. तुमचा हा सत्तेचा खेळ झाला असेल तर शेतकऱ्यांकडे ही बघा असा सवाल कैलास पाटील यांनी केलाय. पाटील यांनी धाराशिव शहरातील खरेदी केंद्राची पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
Palghar News: पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून EVM आणि VV पॅड च्या फेर तपासणीची मागणी
पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून EVM आणि VV पॅड च्या फेर तपासणीची मागणी
बहुजन विकास आघाडीच्या तीनही उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे मागणी. तर वसई विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पवार गटाचे सुनील भुसारा यांच्याकडूनही मागणी
वसईतून हितेंद्र ठाकूर, नालासोपारातून क्षितिज ठाकूर, बोईसर मधून राजेश पाटील यांची EVM आणि VV पॅड च्या फेर तपासणीची मागणी
निकाल लागल्यानंतर 45 दिवसांनी EVM आणि VV पॅड ची तज्ञ मार्फत होणार तपासणी
तपासणी वेळी संबंधित मतदान केंद्रावरील EVM आणि VV पॅड वर पुन्हा मतदानाचे प्रात्यक्षिक केले जाणार. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रामागे 40 हजार रुपये अधिक 18% GST शुल्क भरावे लागते
पाचही उमेदवारांनी याबाबतचे शुल्क भरून तपासणी अर्ज केले दाखल. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांची माहिती
मध्य रेल्वेच्या वसई दिवा रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
बाड़मेर - यशवंतपुर एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याने वसई दिवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत
बाड़मेर - यशवंतपुर एक्सप्रेस च्या एका डब्याचे व्हील जाम झाल्याने गाडी थांबवली
दिव्यावरून वसई कडे येणाऱ्या गाड्या खोळंबल्या
Uday Samant: एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहून नेतृत्व करावे: उदय सामंत
कालची चर्चा सकारात्मक झालीय. परत एकदा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत चर्चा होवून सरकार स्थापनेचा निर्णय घेतला जाईल. नाराजी वगैरे काहीही नाही.फोटोवरून ठरवणे योग्य नाही. बैठक होईल की नाही यापेक्षा निर्णय काय झाला हे महत्वाचे आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहून नेतृत्व करावे
लाडकी बहिणची नियमावली आहेच की..त्यात काही बदल होणार नाही. तुमच्या कालावधीत ३५ दिवस लागले होते सरकार स्थापन करायला. भाजपचा गटनेता निवड होईल व मग २ दिवसांत सरकार स्थापन होईल.
Maharashtra Politics: 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? सूत्रांची माहिती
राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. अशातच आता 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Live Update : संभल मशीद वादावर 'सुप्रीम' आदेश, मुस्लीम पक्षाला दिलासा; उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला
सर्वोच्च न्यायालयाने संभलच्या मशीद वादावर होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर स्थगिती आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना मुस्लीम पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. 8 जानेवारीपर्यंत या प्रकरणात कोणतीही कारवाई करू नका, शांतता आवश्यक आहे, असे न्यायालयाने ट्रायल कोर्टाला सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जोपर्यंत सर्वेक्षणाच्या आदेशाला आव्हान देणारी मशीद समितीची याचिका उच्च न्यायालयात सूचीबद्ध होत नाही तोपर्यंत ट्रायल कोर्टाने संभल जामा मशिदीबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पुढे जाऊ नये. सीआय संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं की, जोपर्यंत प्रकरण उच्च न्यायालयासमोर सूचीबद्ध होत नाही, तोपर्यंत पुढील कारवाई दिलेल्या आदेशानुसार चालेल. काही दिवसांपूर्वी संभल जामा मशिदीजवळ हिंसाचार घडला होता. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व्हेक्षणादरम्यान हा हिसाचार उफाळला होता.
Akola Cylinder Blast: गॅस सिलेंडरने घेतला पेट, घरगुती साहित्य जळून खाक
अकोल्यात सरस्वती नगर गोरक्षण रोडमधील रामकृष्ण पाटील यांच्या घरी सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली आहेय... त्यामुळे एकच खळबळ उडाली होतीय... मात्र या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून घरातील सामान जळालेय.. दरम्यान घटनेची माहिती अग्निशामक विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. लिडिंग फायरमन प्रदीप तायडे, वाहन चालक पंकज जैस्वाल, फायरमन अशोक प्रधान यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
Jitendra Ahwad News: जितेंद्र आव्हाड वर्षा बंगल्यावर; एकनाथ शिंदेंची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत.
Sangli Crime: किरकोळ वादातून हॉटेल कामगाराचा खून
सांगलीच्या सावंत प्लॉट परिसरात किरकोळ वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत रा. सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा रात्री खून करण्यात आला..गुरुवारी रात्रीच्या सुमारास घ खुनाचा प्रकार घडला. शैलेशचा खून करणारे दोघा संशयित हल्लेखोरासह एका बालकास एलसीबी कडून ताब्यात घेतले आहे.एका हॉटेलमध्ये मयत शैलेश याच्याशी हल्लेखोरांचा वाद झाला होता. या वादानंतर संशयित आणि त्याला हॉटेलमधून बोलावून घेतले आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस असणाऱ्या मराठा सेवा संघ शेजारी अंधाऱ्या जागी नेले. त्या ठिकाणी संशयतांनी मयत शैलेश याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शैलेश पळत बाहेर मुख्य रस्त्यावर आल्याची माहिती आहे.
Live Update : AICC काँग्रेस पक्षाचे 5 जणांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार
ते मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असून रमेश चेन्निथला, नाना पटोलेसुद्धा शिष्टमंडळात असतील.
Live Update : एकनाथ शिंदे गावाला, मुंबईतील आज महायुतीची बैठक पुढे ढकलली
आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दोन दिवसानंतर अमित शाहांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होईल असं सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे साता-याला आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीची बैठक होणार नसल्याची माहिती आहे.
Live Update : नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू
नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू झाली असून वानखेडे, शिवाजी पार्क,
आझाद मैदानाचा विचार केला जात आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचपणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Live Update : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या घरावर पॉर्नोग्राफी प्रकरणात ईडीची छापेमारी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी कंटेन्टची निर्मिती आणि वितरणाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
Live Update : 'फेंगल' चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'फेंगल' चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय.
Live Update : रत्नागिरीकरही थंडीने कुडकुडले, मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीत 10 अंश सेल्सिअस तापमान
रत्नागिरीकरही थंडीने कुडकुडले, मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीत 10 अंश सेल्सिअस तापमान
Live Update : दुूबईतील स्पर्धेत आंबेगावच्या शार्दुल पडवळणे जिंकलं गोल्ड मेडल
दुबई येथे पार पडलेल्या world mind sports championship स्पर्धेत आंबेगावच्या शार्दुल पडवळणे गोल्ड मेडल जिंकलंय, शार्दुलने भारताचे प्रतिनिधित्व करत हे घवकघत यश मिळवलं आहे. भारतातील १५० मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
Live Update : शहरातील रक्त पेढीत 30 टक्केचं रक्तसाठा शिल्लक
दिवाळी सुट्ट्या आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिराची संख्या घटल्याने अहिल्यानगर शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. महानगरपालिकेसह खाजगी रक्तपेढीत सध्या तीस टक्केच रक्त साठा शिल्लक असल्याने हा रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नगर शहरात रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. यातील बहुतांशी रुग्णांना तत्काळ रक्ताची गरज भासते आणि वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे सामाजिक संस्था सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील शासकीय तसेच खाजगी जनकल्याण रक्तपेढी सध्या 30 टक्केच रक्त संकलन असल्याने यामध्ये ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव तसेच निगेटिव्ह रक्तगटाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे..
Live Update : अमळनेर तालुक्यात रब्बीच्या पेरणींना वेग
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात निवडणुकांमुळे लांबलेल्या रब्बीच्या पेरण्यांना वेग आला असून मका गहू हरभरा बाजरी या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पहायला मिळत आहे. सद्यस्थितीत तापमानात घट झाल्याने थंडी वाढत असून मका हरभरा गहू या पिकांना देखील थंडीचा चांगला फायदा होतो त्यामुळे या पिकांना शेतकऱ्यांची पसंती पाहायला मिळत आहे.
Live Update : एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार तानाजी सावंत यांना नामदार करणार, कळंब शहरात झळकले बॅनर
तानाजी सावंत यांना नामदार करण्याचे बॅनर कळंब शहरात झळकले आहेत, मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळणार तानाजी सावंत यांना नामदार करणार अशा स्वरूपाचा हा बॅनर आहे. युवा सेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथील सभेत दिलेला तुम्ही तानाजी सावंत यांना आमदार करा मी नामदार करतो हा व्हिडिओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.