महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या लढाईसाठीचा पट ( Maharashtra Assembly Election 2024) सजला आहे. युती आणि आघाडीतील (Mahayuti and Mahavikas Aghadi) नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत. या दोघांनाही नामोहरम करण्यासाठी तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी (VBA), मनसे (MNS) यांच्यासारखे पक्ष आणि आघाड्या सरसावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात बघायला मिळाली नव्हती अशी चुरशीची निवडणूक यंदा पाहायला मिळेल असे भाकीत वर्तवले जात आहे. जिंकणार कोण? महायुती का महाविकास आघाडी असा प्रश्न सर्वसामान्य मतदार, पत्रकार आणि राजकीय घडामोडींमध्ये रस असलेली मंडळी एकमेकांना विचारून उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्की वाचा : महायुती आणि महाविकास आघाडीकडून किती जागा जाहीर? अद्याप किती जागांवर तिढा?
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सीएसडीएस आणि एमआयटी एसओजी या सर्वेक्षण अहवालानुसार पायाभूत सुविधा, विकास कामे आणि सरकारने विविध घोषित केलेल्या योजनांमुळे या सर्वेक्षणात महायुतीच्या बाजूने मतदारांचा कौल दिसत असल्याचं सांगितलं गेलंय. सध्या सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने घोषीत केलेल्या योजना, पायाभूत सुविधा, अनुसूचित जाती- जमातीसाठी महामंडळे,माझी लाडकी बहीण योजना याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे.
नक्की वाचा: महायुतीचं जागावाटपाचं सूत्र कसं असेल? आशिष शेलारांनी सांगितलं कोण किती जागा लढवणार?
लोकनिती सीएसडीएस आणि एमआयटी सॉगने केलेले सर्वेक्षण 21 सप्टेंबर आणि 6 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले. सर्वेक्षणात म्हटले आहे की, सार्वजनिक वाहतूक, वीज, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासारख्या क्षेत्रांमध्ये बरीच सुधारणा झालेली दिसून आली आहे. या क्षेत्रातील बऱ्याचशा सुधारणांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करत योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय समृद्धी महामार्ग कोस्टल रोड, अटल सेतू आरे ते बीकेसी मेट्रो यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करून ते वापरात आल्याने महायुतीकडून या विकासकामांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. याशिवाय लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरेल अशी आशा महायुतीला वाटते आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी अर्ज भऱण्यापूर्वी केलेल्या भाषणातही या योजनेचा उल्लेख केला आणि या योजनेवर टीका करण्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, कारण त्यांच्यासाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत. या लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरच्या न्यायालयात केस केली. त्यामुळे या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील.
नक्की वाचा : आम्ही देखील देवीला बोकड देतो, 100 देवळं फिरतो - जितेंद्र आव्हाड
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकनिती सीएसडीएसचे सहसंस्थापक संजय कुमार यांनी सांगितले की, ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. मात्र भाजपने याला अपवाद निर्माण केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या 105 जागा असताना 40 मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयूपेक्षा भाजपचे आमदार जास्त आहेत मात्र तरीही मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना देण्यात आले. मात्र यंदा भाजपला शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा दुपटीहून अधिक जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याकडे भाजपचा कल असेल. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हा पहिला पर्याय असतील मात्र इथे आमदार आणि केंद्रीय नेतृत्वदेखील महत्त्वाची भूमिका बजावेल. मुख्यमंत्री निवडताना राजकीय समीकरणे, जातीची गणिते याचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे.