कोकणातील महायुतीच्या विजयासाठी काम करणाऱ्या तरुणानं घेतली फडणवीसांची भेट

Maharashtra Election Result 2024 :  राज्यातील अन्य भागांप्रमाणे कोकणानंही महायुतीला भरभरून यश दिलंय. महायुतीच्या या कामगिरीत पडद्यामागं काम करणाऱ्या अनेकजणांचा हात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Maharashtra Election Result 2024 :  विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 233 जागा जिंकून दमदार यश मिळवलंय. राज्यातील अन्य भागांप्रमाणे कोकणानंही महायुतीला भरभरून यश दिलंय. महायुतीच्या या कामगिरीत पडद्यामागं काम करणाऱ्या अनेकजणांचा हात आहे. यामधील एक तरुण चेहरा असलेल्या अनिकेत पटवर्धन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

कोण आहेत अनिकेत पटवर्धन? 

अनिकेत पटवर्धन यांच्याकडं रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून जबाबदारी होती. कोकणामध्ये महायुती टिकवण्यासाठी कार्यकर्ते तसंच नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम त्यांनी केलं.  रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि चिपळूण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होण्यात त्यांचे योगदान होते. 

  ( नक्की वाचा : Maharashtra Election Result : महायुतीच्या दिग्विजयात RSS चं मोठं योगदान, वाचा संघानं कसा केला प्रचार? )
 

भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या टीमचा ते सदस्य होते. त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कामाचं रविंद्र चव्हाण तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. निवडणूक निकालानंतर पटवर्धन यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यांनी पक्षानं सोपवलेल्या जबाबदारीसाठी फडणवीस यांचे आभार मानले. 

कोणताही फोटो किंवा बडेजावाची अपेक्षा न करता पडद्याच्यामागे राहून शांतपणे, संयमीपणे सगळं काम कशा पद्धतीने करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून पटवर्धन यांच्याकडे पाहिलं जातंय. भाजपाच्या नेतृत्त्वाने त्यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी सोपवली तर ते ती जबाबदारी देखील उत्तमपणे पार पाडतील, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. 

Advertisement
Topics mentioned in this article