
मुंबई: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत असून अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरुन टीका होत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
"हे मला भाषणातून गरीब होते. पण मी गप बिचारा ऐकत होतो. मी गरीब असल्याने इकडे बसलोय. आता समोरच्या बाकावर बसलेल्यांनी ठरवायचे आहे की मागील पाच वर्षात राज्य पुढे गेले की मागे गेले? माझे तर म्हणणे आहे राज्य पुढे गेले. त्यामध्ये मागील दोन वर्षात प्रगतीचा वेग अधिक होता. काही लोकांनी “अर्थसंकल्प विचार करुन सादर केलेला व संतुलित आहे”, अशीही प्रतिक्रिया दिली. माझा उत्साह वाढवणाऱ्यांसाठी मला एकच म्हणावंसं वाटतं. ऐकल्या शिव्या दुनियेच्या जाहली जरी बदनामी. हे काय कमी मजसाठी, मी तुम्हा आवडलो आहे.. असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
"दादा, कुठे गेला तुमचा वादा ? असेही अनेकानी भाषणात विचारले. त्यांना आणि स्मारके बांधण्याची, सन्माननीय व्यक्तींच्या अवमानाची भाषा करणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो, जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता, जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता.. मै, बातें, अपने ताकत से, ज्यादा, नहीं करता तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की, तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की, लेकीन, औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता," असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)
"मागील पाच वर्षात सगळेच सत्ताधारी होते. त्यामुळे पाच वर्षात प्रगती झाली नाही असं म्हणणं योग्य नाही. उद्धव ठाकरे कार्सकाळात पाच वर्षात राज्य मागे गेले असं भास्कर जाधव म्हनणार का?राज्यातील महायुती सरकारला लोकांनी भरभरुन प्रेम दिलं.मोजकी टाळकी तुम्ही काय करणार पाच वर्ष या सरकारला ब्रहम्देव ही हलवू शकत नाही," असे म्हणत अजित पवार यांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world