जाहिरात
22 minutes ago

Maharashtra Budget Session : आजपासून (3 मार्च 2025) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन  3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय (maharashtra assembly budget session 2025) अधिवेशन आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. यंदाचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट बस स्टँडवरील महिलेवर अत्याचार या प्रकरणांवरुन सरकारला घेराव घातला जाऊ शकतो. 

LIVE UPdate: 'अधिवेशनात शिस्तीचे दर्शन दाखवा...', मुख्यमंत्र्यांचे भाजप मंत्र्यांना आदेश

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपच्या शिस्तीचे दर्शन झालं पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या मंत्र्यांना आदेश

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या मंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप

भाजपच्या मंत्र्यांबाबत ती बाब नको... फडणवीस यांचे बैठकीत आदेश

मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त सभासद नोंदणी अपेक्षित, भाजपच्या बैठकीतील निर्णय

स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी लोकांपर्यंत पोहोचा देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

LIVE Update: तानाजी सावंत सागर बंगल्याबाहेर वेटिंगवर; CM फडणवीसांच्या भेटीसाठी ताटकळले

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेलेत.. मात्र त्यांना आतमध्ये प्रवेश न मिळाल्याने ते सागर बंगल्याबाहेर वेटिंगवर उभे असल्याचे पाहायला मिळाले. 

Washim News: वाशिममध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक, पंचायत समितीवर मोर्चा

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोप येथील महिला पाण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झाल्याचे पहायला मिळालं. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागण्यासाठी आज मोप येथील महिलांनी रिसोडच्या पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी पंचायत समितीचे बीडीओ गैरहजर असल्यामुळे महिला आणखीनच आक्रमक झाल्या. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

Nandurbar Accident: स्कूल व्हॅनचा भीषण अपघात, 1 विद्यार्थी ठार

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील हिंगणी गावाजवळ स्कुल व्हँनला आयशरने धडक दिल्याने एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यु झाला अशून 15 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहादा शिरपुर रस्त्यावर तोरखेडा गावातून ही टाटा मॅझीक स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना सकाळी शिरपुर येथील शाळेत घेवून जात होती. यावेळी मागून येणाऱया आयशरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात  तोरखेडा गावातील प्रशांत भगवान घोरपडे हा 20 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यु झाला

Live Updates: प्रशांत कोरटकर सायबर पोलिस ठाण्यात हजर राहण्याची शक्यता

आज सायंकाळी प्रशांत कोरटकर नागपूरच्या सायबर पोलिस ठाण्यात हजर राहतील अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने कोरटकर यांना 48 तासांत मोबाईल फोन आणि सिम कार्ड सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.आज सायंकाळी मुदत संपते आहे.

पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की सिम कार्ड आणि मोबाईल फोन सादर करताना कोरटकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेशावरून दिसते आहे. सादर केलेला सिम कार्ड आणि मोबाईल जप्त करून त्यांना सील करून कोल्हापूर साठी रवाना करण्यात येईल. नागपूर पोलिसांचे काम तितकेच आहे. नागपूर पोलिसांना अद्याप कोल्हापूर न्यायालयाचे आदेश प्रत मिळालेली नाही.

LIVE Update: मविआला विरोधीपक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमी, संख्याबळ नसल्याने अडचण वाढणार

विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे महाविकास आघाडी कडून अद्याप विरोधी पक्षनेतेपद संदर्भात पत्रच पाठवले गेले  नाही

महाविकास आघाडीची संख्याबळ मुद्दा विरोधी पक्ष नेते पद देण्याबाबत अडचणी ठरणार ? 

लोकसभेत ज्या प्रमाणे निकष लावले त्यात निकषांवर राज्यात विरोधी पक्ष नेते पद देणे कठीण असणार - सूत्र 

विधानसभा अध्यक्ष कार्यालयकडून लोकसभेत विरोधी पक्ष नेते पद नियम लावले त्याचा संदर्भ उपयोग करून निर्णय घ्यायच्या तयारीत - सूत्र 

तुर्तास या  अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्ष नेते पद यावरून तोडगा निघण्याची शक्यता कमी -

LIVE Update: भाजप मंत्र्यांना CM फडणवीस यांच्याकडून स्नेहभोजनाचे आमंत्रण

- भाजपच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्नेहभोजनाचे आमंत्रण

- देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर मंत्रीगण येण्यास सुरुवात

- मंत्री अशोक उईके, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री सागरवर दाखल

- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस मंत्र्यांना मार्गदर्शन करणार

मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, गणेश नाईक , शिवेंद्रसिंहराजे भोसले, माधुरी मिसाळ, पंकज भोयर ,मंत्री जयकुमार रावल ,नितेश राणे बैठकीला उपस्थित

Jalgaon Crime: जळगाव छेडछाड प्रकरण! संशयित आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीट कोठडी

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणातील संशयीत अनिकेत भोई अनुज पाटील व चेतन भोई यांना न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी 

तीनही संशयीतांना 5 मार्चपर्यंत सुनवण्यात आली पोलीस कोठडी

LIVE UPDTE: विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, पाच रिक्त जागांवर कुणाची लॉटरी लागणार?

राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये कोणाचा नंबर लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

LIVE Update: सोमनाथ सूर्यवंशीला राजीनामा द्या... आझाद मैदानावर विराट मोर्चा

सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहीजे म्हणून मोठ्या संख्येने आझाद मैदानात येथुन मोर्चा निघाला आहे मात्र हा  मोर्चा पोलिसांनी आडवला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे, ज्यामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेत. 

LIVE Update: लातूर - नांदेड महामार्गावर एसटीचा भीषण अपघात, अनेक जण जखमी

 लातूर - नांदेड महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.. लातूर अहमदपूर एसटी बसला अपघात झाला आहे... महामार्गावर दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे... घटनास्थळी पोलिसांनी नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढत लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे... या अपघातात एसटी बस मधून प्रवाशांचे हात पय तुटून प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत... जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे... या अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदी झाली आहे... बस मधे 40 च्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक सुरू

महाविकास आघाडीच्या नेत्यांची अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक सुरू; आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, अनिल परब बैठकीला उपस्थित

कृषीमंत्र्यांना झालेल्या शिक्षेवरून विधानपरिषदेत विरोधकांचा प्रश्न, CM फडणवीस म्हणाले...

कृषीमंत्र्यांना झालेल्या शिक्षेवरून विधानपरिषदेत विरोधकांचा प्रश्न

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शोकप्रस्तावाच्या आधी विचारला प्रश्न

शिक्षेसंदर्भात सरकारची भूमिका काय ? असा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारला

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव, 

देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला दिली माहिती

सदर प्रकरणात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली असून, क्लोज फॉर ऑर्डर ठेवलं आहे, न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याबाबत याबाबत सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील- फडणवीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवली. त्यांना उपचरासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांना दौऱ्यामुळे अशक्तपणा, ताप अशी लक्षणे दिसत असल्याने त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर रुग्णालयाकडे हलवण्यात आलं आहे. 

आमदार संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

आमदार संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण आम्ही मागच्या अधिवेशनात काढलं होतं. नैतिकतेच्या आधारावर तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही तर आक्रमक होणारच.  वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असून देखील राजीनामा घेतला जात नाही, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं. 

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाला सुरुवात

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाला सुरुवात

  • महाराष्ट्र नॅशनल टेक्सटाईल मिशनची घोषणा करणारे पहिले राज्य
  • राज्यातील टेक्सटाईल क्षेत्रातील रोजगाराला यामुळे चालना मिळेल.
  • नागपूर-गोवा शक्तीपीठ बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला. यातून त्या भागाची आर्थिक प्रगती होईल.
  • ईव्ही गाडी धोरण स्वीकारलं, यामुळे प्रदूषण कमी होईल.
  • राज्यातील सर्व टोल एप्रिल 2025 आधी फास्टटॅग  होतील. यामुळे लोकांना प्रवासाची गती वाढेल.

विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

विरोधकांची मुंडे आणि कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी 

"महाराष्ट्रात दोन गुंडे, कोकाटे आणि मुंडे"

विरोधक दोघांच्याही राजीनामाची मागणी करत आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन

महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कडक कायदा पारित करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार - अमोल मिटकरी

आमदार अमोल मिटकरी

छत्रपती शिवाज महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकणाऱ्यांना चाप लावण्याकरिता म्हणजे राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर असो यांच्यावर सरकारने देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करुन त्यांना जेरबंद करावं. प्रशांत कोरटकरने काल व्हिडीओ शेअर करुन माफी देखील मागितली नाही. महापुरुषांविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कडक कायदा पारित करण्याची विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. 

Rahit Pawar On HSRP : रोहित पवारांचा HSRP नंबर प्लेटवरून सरकारवर हल्लाबोल

रोहित पवारांचा HSRP नंबर प्लेटवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात  HSRP नंबर प्लेट बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट गुजरातच्या कंपनीला दिली आहे. महाराष्ट्रात  HSRP नंबर प्लेट गुजरातपेक्षा तिप्पट महाग आहे. गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने सर्वसामन्यांच्या खिशातून अतिरिक्त 2000 कोटी रुपये काढत आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. 

लातूरमध्ये 56 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन अंध मुलीवर अत्याचार

लातूरच्या उदगीर येथे एका 56 वर्षाच्या नराधमाने 16 वर्षाच्या अल्पवयीन अंध आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. उदगीर शहरालगत असलेल्या जय हिंद पब्लिक स्कुल या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका 16 वर्षीय अंध आदिवासी अल्पवयीन मुलीला आरोपीने तुझ्या आईचा फोन आला आहे, असे सांगून बोलावून घेऊन 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रदीप हेमसिंग जाधव-नाईक, मुकुंदराव गोविंदराव मानकर, उपेंद्र मंगलदास शेंडे व तुकाराम हरिभाऊ बिरकड, माजी वि.स.स. यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकप्रस्ताव आज मांडला जाणार आहे.

Live Update : आज सकाळी 10 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. आज पुरवण्या मागण्या आणि शोक प्रस्ताव सादर केला जाईल. विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूरू केलेल्या

अनेक कल्याणकारी योजनांनमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची चर्चा आहे. यामुळे सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक अधिवेशनात घेराव घालतील. सकाळी 10 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. सकाळी 10.30 वा. विधिमंडळ पायरीवर विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे. तर 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू होईल. 

Live Update : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक