
सोमवारपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी आज (रविवार, 15 डिसेंबर) राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनात शपथविधी सोहळा पार पडेल. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपदे अन् खाते वाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याने शपथविधी सोहळा रखडला होता. आज अखेर त्याला मुहूर्त लागला असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी:
- देवेंद्र फडणवीस
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- पंकजा मुंडे
- गोपीचंद पडळकर
- गिरीश महाजन
- रविंद्र चव्हाण
- मंगलप्रभात लोढा
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- राहुल कुल
- माधुरी मिसाळ
- संजय कुटे
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
- एकनाथ शिंदे
- संजय शिरसाठ
- भरत गोगावले
- आशिष जयस्वाल
- योगेश कदम
- विजय शिवतारे
- आबिटकर किंवा यड्रावकर
- उदय सामंत
- शंभूराजे देसाई
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
- अजित पवार
- छगन भुजबळ
- आदिती तटकरे
- संजय बनसोडे
- मकरंद पाटील
- नरहरी झिरवाळ
- धनंजय मुंडे
- अनिल पाटील
ट्रेंडिंग बातमी - सावरकर ते द्रोणाचार्य! संविधानावरील चर्चेतून राहुल गांधींकडून भाजपची कोंडी
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहेत. आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक काढलणी जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर सजावट करण्यात आली आहे. तसेच आज सायंकाळी रामगिरी बंगल्यावर होणार पारंपरिक चहापान आणि पत्रकार परीषद होणार आहे. आता आजच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world