जाहिरात
4 hours ago

Operation Sindoor Live Updates:  ऑपरेशन सिंदूरनंतर गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं ही घोषणा केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. 

शिवसेना मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आशावादी

शिवसेना मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आशावादी 

उदय सामंत यांचं कौतुक करताना पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी व्यक्त केली अपेक्षा

रत्नागिरीतील मुख्य बसस्थानकाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी गोगावलेंचं वक्तव्य

पाकिस्तानचे 30 ते 40 सैनिक मारले गेले

भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे तीस ते चाळीस सैनिक मारले गेल्याची माहिती सैन्य दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. शिवाय पाकिस्तानच्या एअर बेसचं ही मोठं नुकसान केल्याचं यावेळी सांगण्यात आलं.  

ऑपरेशन सिंदूरमध्ये 110 अतिरेक्यांचा खात्मा, सैन्य दलाने केले स्पष्ट

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानात लपलेल्या 110 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता असं ही भारतीय सैन्य दलाने स्पष्ट केलं आहे. तिन्ही सैन्य दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट करण्यात आली. 

Chhatrapati Shivaji Maharaj Inauguration: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा: मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  भव्यदिव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नारायण राणे, नितेश राणे तसेच शिंवेंद्रराजे भोसले या लोकार्पण सोहळ्यास हजर राहतील. 

Pune Acciden: पुण्यात मोठा अपघात! भरधाव कारने 5-6 दुचाकींना उडवलं

पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात 

भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकींना उडवलं

पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला अपघात

मद्यप्राशन करत कार चालकाने वाहनांना दिली धडक 

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये कार चालकविरोधात गुन्हा दाखल 

सुदैवाने अपघातात कुणीही जखमी नाही

अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल

Pune News: खेड सेझच्या औद्योगिक क्षेत्रात मध्यरात्री गोळीबार, 8 जण ताब्यात

खेड सेझच्या औद्योगिक क्षेत्रात मध्यरात्री गोळीबार...

गुन्हेगारी टोळीकडुन गोळीबार करत औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न.

गाड्यांचीही तोडफोड 

दोन जण जखमी..जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

हॉटेल दुर्वाकुर मालकाच्या मुलावर गोळीबार 

हॉटेल च्या बिल आणि औद्योगिक क्षेत्रात कामांवरुन गोळीबार झाल्याचा पोलीसांचा अंदाज..

राजगुरुनगर पोलीसांनी 8 जणांना ताब्यात घेतले असुन 2 मुख्य आरोपी फरार

Satara News: सातारा- लोणंद रस्त्यावर भीषण अपघात, 3 ठार

सातारा-लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ रविवारी मध्यरात्री अडीच वाजता मिनी ट्रॅव्हल्स व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. इचलकरंजी येथील भाविक उज्जैनला देवदर्शनासाठी जात असताना ट्रॅव्हल्स यांच्यात सालपे घाटात वळणावर जोरदार धडक झाली. 

Delhi Live Updates: दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर आज दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक पार पडत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या बैठकीला उपस्थित  आहेत. 

LIVE Updates: पाकिस्तान झिंदाबाद लिहिणाऱ्या तरुणीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

पुण्यात पाकिस्तान झिंदाबाद ची पोस्ट लिहिणाऱ्या इंजिनियर तरुणीला पाच दिवसांची पोलिस कोठडी 

दोन दिवसांपूर्वी कोंढवा मधून तरुणीला केली होती अटक 

आता या तरुणीची एटीएस ही चौकशी करणार का हे पहाव लागणार आहे .

काल पोलिसांनी तरुणीला न्यायालयात हजर करताना घेतली मोठी खबरदारी 

तरुणीवर कुठे ही हल्ला होऊ नये यासाठी तरुणीच्याच पेहरावसारखी महिला पोलीस कर्मचारी न्यायालयात हजर केली 

पहलगाम येथे हल्ला झाला त्यांनतर संबधित तरुणी श्रीनगर येथे कुटुंबाकडे जाऊन आली होती.

त्यामुळे तरुणी कोणाच्या संपर्कात होती याचा पोलिसांना तपास करायचा आहे त्यामुळे तिची कोठडी मागितली 

आणि न्यायालयाने ती मान्य केली आहे

LIVE Updates: राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा: सत्यकी सावरकर यांचे न्यायालयात निवेदन

राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा , सत्यकी सावरकर यांचे न्यायालयात निवेदन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कथित बदनामीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी वारंवार तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात केली आहे

राहुल  गांधी यांनी याचिकेवर म्हणणे नोंदविणे टाळल्याचा देखील आरोप

यावर राहुल गांधींच्या वतीने वकील मिलिंद पवार २८ मे रोजी न्यायालयात उत्तर देणार

Maharashtra Weather Update: पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज 

शहरासह जिल्ह्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह  वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता 

पुणे वेधशाळेचा अंदाज 

तर राज्यातील कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस तर विदर्भात पाच दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस असणार 

पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे असून, शहर आणि घाट विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज

Washim News: वाशिममध्ये अवकाळी पावसाचा फटका, पिकांचे मोठे नुकसान

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल पाहायला मिळत असून, तापमानात कमालीची घट झाली आहे. अशात अचानक काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या सोंगलेल्या आणि सुडी मारलेल्या मूग पिकाला बसत आहे. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरात काही शेतकऱ्यांनी उन्हाळी मूगपीक सोंगून ताडपत्री झाकून सुडी मारून ठेवली होती.मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मूग पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

Sangli News: रेल्वे पुलावर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात

सांगलीच्या मिरज या ठिकाणी रेल्वेपुलावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता,की दुचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला तर चार चाकी वाहनाचाही मोठा नुकसान झाला आहे. भराधाव दुचाकीस्वर आणि चार चाकी स्वारा वाहनाच्या मध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.अपघातामुळे काही वेळ- सांगली-मिरज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Washim News: हळद काढणी अंतिम टप्प्यात; उत्पादनात घट

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात हळद काढणी सध्या अंतिम टप्प्यात असून शेतकरी दिवसरात्र राबून काढणीची कामे पार पाडत आहेत. यंदा हवामानातील चढ-उतारामुळे हळदीच्या उत्पादनात काहीशी घट झाली आहे. हळद पिकाची उशिरा लागवड झालेल्या शेतांमध्येही काढणीचा वेग वाढवण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण हळद काढणी पूर्ण होईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महत्त्वाची नगदी पीक असून शेतकऱ्यांचे जीवनमान आणि अर्थव्यवस्था हळदीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी बाजारातील दर चांगले मिळत आहे..

Nandurbar News: लक्कडकोट परिसरात दोन दिवसापासून वीजपुरवठा नाही

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये विजेचा लपंडाव कायमचा झाला आहे त्यातच एकीकडे विजेचा लपंडाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी चा संघर्ष यातच या भागातील महिलांना तासतास वाया घालावे लागत आहे डोंगराळ दुर्गम भागात हात पंप खराब असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे..

LIVE Updates: वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट, 4 दुकानांचे नुकसान

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील घटना

वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने चार दुकानांचे मोठे नुकसान

आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसल्याने इमारतीच्या काचा फुटल्या

सुदैवाने जीवितहानी नाही, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

LIVE Updates: श्रीनगरमध्ये उशिरा रात्री ब्लॅकआउट हटवले

रात्री 9 वाजल्यानंतर LOCवर गोळीबाराची कोणतीही बातमी नाही

•श्रीनगरमध्ये उशिरा रात्री ब्लॅकआउट हटवण्यात आला

•रात्री 9:30 नंतर श्रीनगरमध्ये कोणतीही ड्रोन हालचाल आढळून आलेली नाही

•रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान श्रीनगरवर सातत्याने ड्रोन हल्ले झाले

•श्रीनगर आणि बडगाम येथील लष्करी तळ तसेच श्रीनगर विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न

•सर्व हल्ल्यांचे प्रयत्न अपयशी

•सर्व ड्रोन हवेतच पाडण्यात आले; यादरम्यान हवेत स्फोटांचे आवाज ऐकू आले

•कोणत्याही प्रकारच्या हानीची माहिती नाही

•लष्कर आणि सुरक्षा दल उच्च सतर्कतेवर

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com