Maharashtra municipal corporation Elections: मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांची आजच घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांची आजच घोषणा होणार
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आज आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला तर आजपासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
Mumbai News: पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का! तेजस्वी घोसाळकरांचा सेनेला 'जय महाराष्ट्र
महापालिका निवडणुकांसाठी साधारण 21 दिवसांचा कालावधी असतो. जर आज निवडणुकीची घोषणा झाली तर पुढील वर्षात 10 ते 15 जानेवारी या दरम्यान निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग कोणत्या तारखा जाहीर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणत्या महापालिकांचा समावेश आहे?
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पनवेल, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड
Nitin Nabin: भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले नितीन नवीन कोण आहेत? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world