जाहिरात
2 months ago
मुंबई:

विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहे. विविध पक्षांकडून उमेदवाऱ्यांची यादी जाहीर केली जात आहे. आतापर्यंत भाजपकडून दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 99 तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 71 तर दुसऱ्या यादीत 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटाचे 45 उमेदवार, ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत 65 आणि दुसऱ्या यादीत 15 उमेदवार, अजित पवार गटाने पहिल्या यादीत 38, दुसऱ्या यादीत 7 उमेदवार तर  शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत 45 आणि दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.  

Live Update : पैठणचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरेंची डोकेदुखी वाढणार

पैठणचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरेंची डोकेदुखी वाढणार

महायुतीत बंडखोरी करून भाजप विधानसभा प्रमुख सुनील शिंदेंचा स्वराज्य पक्षात प्रवेश

सुनील शिंदे यांनी यापूर्वीच दाखल केला होता उमेदवारी अर्ज

सुनील शिंदे स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवणार

संभाजी राजेंनी दिला शिंदेंना एबी फॉर्म

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी समोर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी समोर आली असून ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 

कारंजा- ज्ञायक  पाटणी

हिंगणघाट- अतुल वामदिले

नागपूर हिंगणा- रमेश बंग

अणुशक्तीनगर- फहाद अहमद

चिंचवड- राहुल कलाट

भोसरी- अजित गव्हाणे 

बीड माजलगाव- मोहन बाजीराव जगताप

परळी- राजेश देशमुख

मोहोळ- सिद्धी रमेश कदम

Live Update : अमित ठाकरेंचा मार्ग सुकर होणार

अमित ठाकरेंचा मार्ग सुकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाली. 

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुखांना अटक

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांना अखेर अटक करण्यात आली आहे. 

पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती.  

 विजय शिवतारे उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज भरणार. उद्या सासवडमध्ये मुरलीधर मोहोळ व विजय शिवतारे यांची एकत्रित सभा होईल. थोड्याच वेळात विजय शिवतारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Live Update : ब्राम्हण समाजाचा महायुतीला पाठिंबा...

ब्राम्हण समाजाचा महायुतीला पाठिंबा...

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला पाठिंंबा जाहीर केला आहे. ब्राह्मण संघटनांचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे यांनी ही माहिती दिली.

बाळासाहेब थोरातांचे चुलतबंधू इंद्रजीत थोरातांसह 26 जणांवर विखे समर्थकांकडून गुन्हे दाखल..

बाळासाहेब थोरातांचे चुलतबंधू इंद्रजीत थोरातांसह 26 जणांवर विखे समर्थकांकडून गुन्हे दाखल..

सुजय विखेच्या धांदरफळ येथील सभेत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आक्रमक थोरात समर्थकांनी गाड्यांची जाळपोळ तोडफोड केली होती. या प्रकरणी चिखली येथे जाळलेली स्कॉर्पिओ  ही विखे समर्थक निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांची होती. 

Live Update : वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी

वांद्रे टर्मिनसमधील फलाट क्रमांक एकवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी रुग्णांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  वांद्रे ते गोरखपूर रेल्वे आल्यानंतर फलाटावर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com