जाहिरात
2 days ago

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी 01 मार्च रोजी केज न्यायालयात पार पडली होती. त्यानंतर दुसरी सुनावणी 12 मार्च रोजी केज न्यायालयात पार पडली होती. त्यानंतर तिसरी सुनावणी ही 26 मार्च रोजी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली होती. त्यानंतर आज 10 एप्रिल रोजी चौथी सुनावणी आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे.

तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात केलं हजर

26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं आहे. कडक सुरक्षेमध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. अमेरिकेतून आणल्यानंतर एनआयएनं आपली कारवाई सुरू केली आहे. 

शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलला लागली आग

छत्रपती संभाजीनगर इथल्या हॉटेल ग्रँड सरोवरला भीषण आग लागली आहे. हे हॉटेल शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचे आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र हॉटेलचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.  

पटियाला हाऊस कोर्टात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

पटियाला हाऊस कोर्टात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या कोर्टात तहव्वूर राणा याला हजर केले जाणार आहे.  त्यामुळे इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

तहव्वूर राणावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

तहव्वूर राणावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NIA चे पथक तहव्वूरला घेवून मुख्यालयात पोहोचले आहे.  पटीयाला एनआयए कोर्टात त्याला हजर केला जाणार आहे. त्यानंतर त्याची कोठडी मागितली जाणार आहे. त्यावर किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावे लागणार आहे. कोर्टाला आज सुट्टी असली तरी विशेष बाब म्हणून हे कोर्ट ओपन करण्यात आलं आहे. मुंबईवरिल 26/11 हल्ल्यातील तो मुख्य आरोपी आहे. अमेरिकेतून आलेल्या विशेष विमानाने त्याला दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आलं होतं. दोन वैद्यकीय तपासण्या केल्या जातील. विमानतळावर एक वैद्यकीय तपासणी केली आहे. 

चेन्नईची धूरा पुन्हा धोनीच्या खांद्यावर

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड राहिलेल्या आयपीएल सिझनमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईची धूरा पुन्हा धोनीच्या खांद्यावर आली आहे. 

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं...

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं... 

Live Update : नाशिक शहरातील सर्व उद्याने दिवसभर राहणार खुली

नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसापासून तापमानाने चाळीशी पार केली आहे. बुधवारी देखील 41.3 तापमान असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळावी याकरता शहरातील 550 उद्यानं दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी शहरातील उद्याने सकाळी 2 तास व संध्याकाळी 5 वाजेदरम्यान सुरू होती. मात्र आता उकाड्यापासून वाटसरूना सावली मिळावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे..

Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांच्या पाच ते सहा किमीपर्यंत रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांच्या पाच ते सहा किमीपर्यंत रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळपासून पुणे लेनवर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून ही वाहतूक कोंडी रोखण्यात महामार्ग पोलीस अपयशी ठरल्याचं दिसत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज सकाळपासून अमृतांजन ब्रिजपासून अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Live Update : आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना 2 कोटी 25 लाखांचे अर्थसहाय्य

समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण २ कोटी २५ लाख अर्थसहाय वितरित करण्यात आले आहे.या योजनेचे उद्दिष्ट समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हे असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचा समान (50:50) हिस्सा असतो.

Live Update : पुणे जिल्ह्यात CNG ची पुन्हा दरवाढ

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये CNG च्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. 

नवीन दरांनुसार, CNG चा किरकोळ दर प्रतिकिलो 89 रुपयांवरून 89.75 रुपये करण्यात आला आहे. 

ही दरवाढ 8 एप्रिल आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे

Live Update : पुणेकरांसाठी खुशखबर, शहरात यंदा पाणीकपात नाही

पुणेकरांसाठी खुशखबर, शहरात यंदा पाणीकपात नाही

शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका धरणात पाणीसाठा

गतवर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीत दोन टक्क्यांनी पाणी अधिक

खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये 11.91 टीएमसी इतका पाणीसाठा 

पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या 40.83 टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही

Live Update : बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्यांकडून ब्रम्हपुरी अर्बन बँकेच्या पथकाची वसुली

कर्जदार शेतकरी एका टेम्पोमधून बैलजोडी नेताना जप्तीची धमकी देऊन तडजोड म्हणून चक्क 200 रुपये वसूल करतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसुली पथकाच्या वाहनावर ब्रम्हपुरी अर्बन बँकेचा फलक लावल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील ही घटना आहे. शेतकरी दरवर्षी शेतीसाठी खासगी बँकांकडून कर्ज काढतात. शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जाची परतफेडही केली जाते. शेतकरी आता पुढील हंगामाच्या तयारी लागला. एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना वाहनातून दोघे उतरून शेतकऱ्याचा टेम्पो थांबविण्यात आला. या वाहनावर अर्बन बँकेच्या वसुली पथकाचा फलक आहे. कर्ज वसुलीचा तगादा लावून जप्तीचा दम देतात. शेतकरी विनवणी करतो. शेतीच्या हंगामासाठी बैलजोडी नेत असल्याचे सांगतो. शेवटी तडजोड होते. शेतकऱ्याने २०० रुपयांची नोट त्या कर्मचाऱ्याच्या हातात दिल्यानंतर वाहनात जाऊन बसतो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कर्ज वसुलीच्या या अजब फंड्याची नागरिकांत जोरदार चर्चा आहे. 

Live Update : धाराशिव राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी गाडी अडवून प्रवाशांना मारहाण करत लूट

धाराशिव राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी गाडी अडवून प्रवाशांना मारहाण करत लूट

सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव येथील कावलदरा परिसरात लुटीचा प्रकार 

पहाटे चार ते पाचच्या दरम्यानची घटना, महामार्गावरून जाणाऱ्या तीन गाड्यांची टायर फोडत वाहने थांबून लूट 

पाच ते सहा जणांच्या टोळीने लूट केल्याची माहिती

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: