जाहिरात
7 hours ago

Maharashtra LIVE Updates:  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश आले असून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप ओबीसी नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा निघणार आहे. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. 

Live Update : कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत 22 तास बत्ती गुल

कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी भाग गुरुवार सायंकाळपासून तब्बल 22 तास अंधारात बुडाला होता. वीज वाहिनीतील अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला आणि शुक्रवार दुपारचे तीन वाजले तरीही वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी अचानक दुकाने बंद ठेऊन आपला रोष व्यक्त केला. मात्र माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, केडीएसमी आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

Live Update : पुण्यात लागले राज-उद्धव यांच्या एकत्रिकरणाचे बॅनर

पुण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे बॅनर लागले आहे. महाराष्ट्र हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र ही श्रीची इच्छा, या आशयाचे बॅनर पुण्यात लागले आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले हे बॅनर शहरात चर्चेचा विषय बनला आहे. 

कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत 

खेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला श्रावण गावडे या मुलाने प्राण

कोडोली इथली हृदयद्रावक घटना, जिल्ह्यात हळहळ

मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत होता श्रावण गावडे 

अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खेळ सोडून तो आईच्या कुशीत विसावला 

मात्र आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला

Pune News: बारामतीतील नियोजित ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. 

या संदर्भात बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला आम्ही पुढील तारीख घ्या अशी आंदोलकांना विनंती केली होती म्हणत आम्ही या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं म्हटलं आहे.

Mumbai News : प्रताप सरनाईक यांनी घेतली देशातली पहिली टेस्ला कार

प्रताप सरनाईक यांनी घेतली देशातली पहिली टेस्ला कार

BKC येथील टेस्ला शोरुम येथे प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक उपस्थित

प्रताप सरनाईक यांनी टेस्ला चे Y मॉडेल घेतले

भारतात पहिली टेस्ला कार धावणार

Mumbai News : प्रताप सरनाईक यांनी घेतली देशातली पहिली टेस्ला कार

प्रताप सरनाईक यांनी घेतली देशातली पहिली टेस्ला कार

BKC येथील टेस्ला शोरुम येथे प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक उपस्थित

प्रताप सरनाईक यांनी टेस्ला चे Y मॉडेल घेतले

भारतात पहिली टेस्ला कार धावणार

Pune News Live : पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल 

 शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय 

 75 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार 

 शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार 

आराखडा तयार करून शिक्षण मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार

बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंडळावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती 

२०२१ साली महाविकास आघाडी सरकार असताना सदर मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती

राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता सुळे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याचा निर्णय

वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नो DJ मोहीम

वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नो DJ मोहीम

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाह

मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने सहभाग नोंदवावा आणि ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून DJ चा वापर टाळावा, अश स्पष्ट सूचना

तसेच, श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अडथळा अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याच अवान 

Nagpur News :नागपूर शहरात अवजड वाहनांना 8 सप्टेंबरपासून नो एन्ट्री

नागपूर शहरात आता ट्रक्सना नो एंट्री, अवजड वाहने आणि ट्रक्सची नागपूर शहरात एन्ट्री 8 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे. सुरुवातीला 8 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही बंदी असेल. ट्रक्सना आउटर रिंग रोडने ये-जा करावी लागेल. वाढत्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी नागपूर पोलिस वाहतूक विभागाचा कठोर निर्णय. 

Maratha Reservation : मराठा आरक्षण जीआरवरून जरांगेंचं समाधान नाहीच?

मराठा आरक्षणाच्या नवीन जीआरवरून मराठा आरक्षण अभ्यासकांमध्येच मतमतांतरे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण जिंकलो आता दिवाळी साजरी करा म्हणणारे मनोज जरांगे देखील जीआरवर पूर्णपणे सहमत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जीआर काढल्यावर देखील जरांगेंकडून अभ्यासकांना बोलावले जात आहे. तर जरांगे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ विखे पाटील यांची भेट घेऊन जीआर मध्ये काही सुधारणा करण्यासाठी सूचना करणार आहेत. काही दस्तऐवज सादर करणार आहे. यासाठी ७ सप्टेंबर रोजी बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्या तर त्याही लगेच दूर केल्या जाणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत सरकारने दिलेल्या जीआरवर जरांगेंचं पूर्णपणे समाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com