जाहिरात

Mumbai Rain Upate : मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा, ठिकठिकाणी पाणा साचल्याने मोठी वाहतूक कोंडी

पुढील तीन तास मुंबईसह उपनगरात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही होत असल्याचं दिसत आहे.

Mumbai Rain Upate : मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा, ठिकठिकाणी पाणा साचल्याने मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Traffic : मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन तास मुंबईसह उपनगरात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुसळधार पावसाचा (Mumbai Heavy Rain) परिणाम वाहतूक आणि रेल्वेवरही होत असल्याचं दिसून येत आहे. 

मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरदार वर्गांना ऑफिस गाठण्यासाठी विलंबन लागत आहे. त्याशिवाय ठाण्यातील तीन हात नका ते मुलुंड टोल नाका मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून संत गतीने वाहन रस्त्यावरती धावत आहे. रस्त्यावरती पडलेले खड्डे, अर्धवट सुरू  असलेली कामं आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीवर फटका बसत आहे. पहाटेपासूनच्या पावसामुळे मुंबतल्या सखल भागात पाणी साचण्यास
सुरुवात झाली असून पूर्व द्रूतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. 


नवी मुंबई उरण फाटा ब्रिजच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे 

अंधेरी सबवेत पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद
 

Maharshtra Rain Live Update : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढील 3 तास धोक्याचे

नक्की वाचा - Maharshtra Rain Live Update : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढील 3 तास धोक्याचे

नवी मुंबई उरण फाटा ब्रिजच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आनंदनगर चेक नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांनी मुंबईकडे निघण्यापूर्वी वाहतुकीची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

वरळीनाका परिसरात पाण्याखाली..

वरळीनाका परिसरात गुडघाभर पाणी साचलं असल्याने येथील वाहतूक बंद झाले आहेत. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकात पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com