
Maharashtra School Bus Association Strike: विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी. राज्यभरातील वाहतूक संघटनासह स्कूल बस चालकांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. 2 जुलै 2025च्या मध्यरात्रीपासून स्कूल बस चालक संप पुकारणार आहेत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार असून पालकांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. काय आहेत या वाहतूक संघटनांच्या मागण्या? जाणून घ्या...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्य सरकारने सर्व वाहनांवरील कर वाढवण्याबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे एक जुलैपासून याची अध्यादेश काढून सर्व राज्यात अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे. या ई चलन आणि अनेक अन्यायकारक कायद्याविरोधात वाहतूक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर स्कूल बस संघटनेनेही संप पुकारला आहे.
स्कूल बस चालकांना ई- चलनांद्वारे सातत्याने दंड आकारला जात आहे. शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना सोडताना पार्किंगची व्यवस्था नसल्यानेही त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक विभागाच्या विविध प्रकाराच्या दंडात्मक कारवाया वारंवार होत आहेत. त्यामुळेच अनिल गर्ग यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनने संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे.
Transporters Strike: ई-चलानसह 'अन्याय्य' दंडाविरोधात वाहतूकदारांचा एल्गार! 1 जुलैपासून बेमुदत आंदोलन
काय आहेत मागण्या?
याआधी विद्यार्थ्यांना सोडताना शाळेजवळील संबंधित थांब्यांसाठी स्कूल बसेसविरुद्ध जारी केलेले सर्व प्रलंबित ई-चलन त्वरित माफ करण्यात यावे. योग्य शालेय पिक-अप/ ड्रॉप-ऑफ झोन निश्चित होईपर्यंत ई-चलन जारी करण्यावर स्थगिती. यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सरकार, आरटीओ, पोलीस आणि वाहतूक संघटनांसह संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करावी, अशा मागण्या या संघटनांनी केल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world