Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या अर्जाची तारीख 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर करण्यात आली होती. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरले नसतील, किंवा अर्ज भरणे शक्य झाले नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. जाणून घेऊया, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
(नक्की वाचा: माहिती हवी! 1 नोव्हेंबरपासून बदणार अनेक नियम, 5 मोेठे बदल होणार)
बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्याचबरोबर पुनर्परीक्षा, खासगी विद्यार्थी, श्रेणीनुसार योजनेंतर्गत त्याचबरोबर काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजमधून अर्ज भरावे लागतील. त्याचबरोबर, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जुनिअर कॉलेजमधूनच अर्ज भरायचे आहेत. 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.
(नक्की वाचा: Update Aadhar Card : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल?)
शिक्षणापासून वंचित असलेल्या, पण किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना खासगीरित्या दहावी-बारावीची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खासगी विद्यार्थ्यांना वीस रुपये या दराने अतिविलंब शुल्क भरावे लागणार असून, 31 ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world