
Maharashtra Weather Updates: मान्सूनने एक आठवडा आधीच केरळमध्ये दमदार एन्ट्री केली असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. 15 वर्षानंतर पहिल्यांदाच मान्सूनने एवढ्या लवकर केरळमध्ये पोहोचला आहे. दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र यावर्षी लवकर भारतात एन्ट्री केल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आजचा हवामान अंदाज
हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड लातूर, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर ओसरला..
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची धुवांधार बरसात सुरू होती. पण कालपासून मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज देखील पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी मात्र अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे.
नक्की वाचा - Monsoon reaches Kerala : आला रे आला! मान्सून आठवडाभरापूर्वीच केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा
सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलीच आहे. आज अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने जिल्ह्याला असून आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता पण वातावरण ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.मागील दोन दिवसात तुलनेत आज पावसाची सरासरी थोडीशी मंदावलेली पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये मोठे नुकसान
मागील चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी 2 सेंटीमीटरने वाढली आहे... माजलगाव धरणाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात अवकाळी पावसामुळे मे महिन्यात प्रथमच पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणात सध्या 426.35 मीटर एवढी पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world