जाहिरात

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचा तडाखा! पिकांचे नुकसान, बळीराजा हतबल, कुठे काय घडलं?

Maharashtra Unseasonal Rain Update: मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यास ज्वारीचे कणसं ओले होऊन दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात अवकाळीचा तडाखा! पिकांचे नुकसान, बळीराजा हतबल, कुठे काय घडलं?

Maharashtra Unseasonal Rain:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई पुण्यासह नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांमधील शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

जळगावमध्ये पावसाचा तडाखा..

जळगाव जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 7 हजार 200 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे. तर या वादळी वाऱ्याचा व अवकाळी पावसाचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला असून हजारो हेक्टर वरील केळी बागा या आडव्या झाल्या आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

वाशिमध्येही अवकाळीचा धुमाकूळ..

वाशिम जिल्ह्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असून पुढील पाच दिवसात आणखी अवकाळी पाऊस अन गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ञाने वर्तवली आहे. मात्र या अवकाळी पावसामुळं काढणील आलेल्या ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे. मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यास ज्वारीचे कणसं ओले होऊन दाणे काळे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

वाशिम, जळगावसह सलग सातव्यादिवशी आज नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. नाशिकसह कुळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, येवला तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुर्दैवी म्हणजे ओझरला भारत पल्हाळ यांच्या मालकीच्या मेंढ्यांवर वीज पडून 8 मेंढी 1 शेळी असे एकूण 09 गर्भवती जनावरे दगावली. नाशिकसह नंदुरबारमध्येही अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com