जाहिरात
5 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांनी पुन्हा या प्रकरणात माफी मागितली तरी राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. 

Indias Got Latent Controversy : मुंबई पोलीस सक्रीय, 'त्या' स्टुडिओची केली पाहणी

मुंबई पोलिसांच्या एक पथकानं सोमवारी खार भागात असलेल्या स्टुडिओची पाहणी केली. याच स्टुडिओमध्ये YouTube शो 'इंडियाज गॉट लेटेंट' चे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमातील एका शो मध्ये यूट्यूबर रणवीर अल्लाहबादिया पाहुणा म्हणून आला होता. त्यानं या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. 

Uday Samant: ईव्हीएमवर विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटता कशाला? उदय सामंत यांचा सवाल

 ईव्हीएमवर विश्वास नसेल तर मुख्यमंत्र्यांना भेटता कशाला असा सवाल करत हा तर दुट्टप्पी पणा असल्याची टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसेचे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती,त्यानंतर  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती,या भेटीवरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे आणि ठाकरे शिवसेनेला हा टोला लगावला

Chhatrapati Sambhajinagar: मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयातून दोन तरूणांना चोप

लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयातून दोन तरूणांना रहिवाशांनी पकडून चांगलाच चोप दिला. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल-जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत ही घटना घडली आहे. यावेळी शेकडो रहिवाशी जमा झाले होते. यावेळी दोन संशयिताना पकडण्यात आले दोघे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या दोघांना हर्सूल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Amravati News: चारचाकी वाहनात तरुणाचा मृतदेह, अमरावतीत खळबळ

अमरावतीच्या काँग्रेस नगर रोडवर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ...

अमरावती पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात...

फॉरेन्सिकच्या टीमकडून बंद कारची तपासणी...

तर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी...

Pune GBS Patient: पुण्यात GBSचे तीन नवे रुग्ण; आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू

पुणे शहरात आतापर्यंत 192 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 167 रुग्णांना GBS ची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.  या आजारामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील आकडेवारी

 * एकूण रुग्ण: 192

 * GBS निदान झालेले रुग्ण: 167

 * मृत्यू: 7 (1 मृत्यू GBS मुळे, 6 संशयित मृत्यू)

 * पुणे मनपा क्षेत्रातील रुग्ण: 39

 * नव्याने समाविष्ट गावांमधील रुग्ण: 91

 * पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रातील रुग्ण: 29

 * पुणे ग्रामीण भागातील रुग्ण: 25

 * इतर जिल्ह्यातील रुग्ण: 8

Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात

नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर दूचाकी स्वाराचा भीषण अपघात 

सीवूड सिग्नल जवळ वाशीला जाणाऱ्या लेनवर झाला अपघात

दुचाकी वेगात असल्याने नियंत्रण सुटून दुचाकी टेम्पोला जाऊन धडकली.

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी. 

सदर अपघात एका वाहनाच्या डॅश कॅम मध्ये झाला कैद.

Suresh Dhas News: जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये... सुरेश धस यांचा टोला

 मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.  या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली आहे... 

Nashik News: नाशिकच्या शिवभोजन चालकांनी घेतली भुजबळांची भेट..

नाशिक शहरातील शीवभोजन चालकांनी आज माजी अन्न व पुरवठा नागरिक मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि ह्या भेटीदरम्यान त्यांना शिवभोजन कायम चालू राहावे याकरता आपणच पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. शिवभोजन सुरूच राहावे याकरता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.

 त्यावेळी शिवभोजन बंद पडणार अशी चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली ह्या हेतूने आज सर्व शिवभोजन चालक हे आमचा व्यवसाय केवळ बंद पडणार नाही तर आमच्याकडे असलेल्या कामगार रोज व येणाऱ्या शेकडो गोरगरीब जनतेचे देखील हाल होतील असे त्यांना पत्र देऊन आपण उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेवून त्यांना ह्या या अर्थसंकल्पात शिवभोजनंचे बजेट धरावे अशी विनंती केली .

Live Updates: गंगाखेड येथील महावितरनच्या सबस्टेशनला आग..

गंगाखेड येथील आज महावितरनच्या 33kw सबस्टेशच्या मुख्य रोहित्रला अचानक आग लागली असता कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी ह्याबाबत गंगाखेड अग्निशमन दलास तातडीने माहिती दिल्याने अग्निशामक दल तत्परतेने दाखल होऊन त्यांनी शर्तीच्या प्रयत्नातून आग तब्ब्ल 1 तास नंतर आटोक्यात आणली, या आगीत 1 कोटीचे रोहित्र जळून खाक झाले आहे, या मुळे गंगाखेड शहरातील विजपुरवठा खंडित झाला असून रात्री उशिरा पर्यंत विजपुरवठा परत सुरु होइल अशे महावितरचे कर्मचारी यांनी सांगितले.....

Mumbai News: खारघर येथे उर्सादरम्यान हाणामारी, अनेक जण जखमी

खारघर येथील ओवे कॅम्प सेक्टर 34 मध्ये हजरत अमीर शाह बाबा यांच्या उर्स कार्यक्रमात झालेल्या हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत. 8 फेब्रुवारी 2025  रोजी रात्री11.40 वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मन्सुर रहीम पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी मन्नान मुनाफ पटेल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मन्नान पटेल यांच्यासह कुटुंबातील काही सदस्य आणि नातेवाईक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये रेशमा अफजल तळवलकर आणि काही जणांचा समावेश आहे, ज्यांना ओवे येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या मारामारीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु काही दिवसांपूर्वी मन्नान पटेल आणि मन्सुर पटेल यांच्यात कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, असा आरोप मन्नान पटेल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Live Updates: राजधानी दिल्लीत नेत्यांचीा डीनर डिप्लोमसी, शरद पवार, श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना निमंत्रण

राजधानी दिल्लीत नेत्यांच्या घरी डीनर डिप्लोमसी:

शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची डीनर डिप्लोमसी…

शरद पवार यांच्याकडून दिल्लीतील सर्व पक्षीय खासदार आणि आमदारांना जेवनाचं निमंत्रण

तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी शिवसेनेच्या सर्व राज्याचे प्रभारी आणि

सर्व पक्षीय आमदारांना जेवनाचं निमंत्रण…

खासदार शिंदे यांच्या घरी सर्व आमदारांना जेवनाचं निमंत्रण असले तरी ठाकरे गटाचे आमदार जाणार नसल्याची माहिती…

आज राजधानी दिल्ली इथं राज्यातील नवनिर्वाचित ९० आमदारांचं प्रशिक्षण शिबीर…

Amravati News: बच्चू कडूंना सर्वोच्च दिलासा! 14 तारखेच्या अविश्वास सभेला स्थगिती

अमरावती जिल्हा बँकेतील 14 तारखेच्या अविश्वास सभेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

बच्चू कडू गटाच्या पाच संचालकांनी विरोधकांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात घेतली होती धाव..

कडू गटांच्या संचालकांना अपात्र करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सहकार विभागाकडून बोलवण्यात आली होती सभा..

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पुढील आदेशापर्यंत सुप्रीम कोर्टाने स्थगित दिली  आहे..

संचालकांकडून संचालकांवरच अविश्वास आणण्याची ही देशातील पहिली घटना,  बच्चू कडू यांची प्रतिक्रिया...

Maharashtra Politics: ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सागर बंगल्यावर; राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून या भेटीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

Live Update : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा घरात 16 लाखांची घरफोडी..

नाशिकच्या पाथर्डी फाटा लगत असलेल्या वासननगर परिसरातुन रविवारी पहाटेच्या सुमारास एका  सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 16 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पहाटेच्या सुमारास एक कार जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. संशयित चोरटे हे याच चारचाकीतून आले असल्याचं बोललं जातंय. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी हे आपल्या मुलाला सोडविण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गेले असताना ही घटना घडली. याबाबत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंदिरा नगर पोलीस करत आहे.

Live Update : 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सोन्याच्या भावात 500 रुपयांची वाढ

3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सोन्याच्या भावात 500 रुपयांची वाढ

जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 85 हजार 500 रुपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे भाव 88 हजार रुपयांवर 

जागतिक घडामोडी व युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या भावात वाढ कायम असल्याचे सराफा व्यापाऱ्यांची मत 

लवकरच सोन्याचे भाव 90 हजारांचा चा टप्पा गाठणार सराफा व्यवसायिकांची माहिती

Live Update : नंदुरबारच्या शहादा शहरात भीषण आग

नंदुरबारच्या शहादा शहरात भीषण आग

आठ ते नऊ दुकानांचा भीषण आग

Live Update : आजची भेट राजकीय नव्हती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री - राज ठाकरे भेट...

आजची भेट राजकीय नव्हती, मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी अभिनंदनाचा फोन केला होता. म्हणून त्यांची भेट घेतली - देवेंद्र फडणवीस

Live Update : गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत

मुंबईत पीओपीच्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे

या संदर्भात ही संघटना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची  भेट घेण्यासाठी जाणार आहेत

Live Update : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात तरुणीवर प्राणघातक हल्ला

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर तरुणीवर प्राणघातक हल्ला

- नात्यातीलच तरुणाने चाकूने केला तरुणीवर हल्ला

- वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज

- हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

- नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

- तरुणीला केले उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल

- पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Live Update : आजचे सोन्याचे भाव किती आहेत?

सोन्याचा भाव 85 हजार रु. जीएसटीसह 87 हजार 550 रू.

चांदीचा भाव 97 हजार रु. जीएसटीसह 99 हजार 910 रू.

आज सोन्या चांदीचे भाव अजून तरी स्थिर आहेत.

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर...

Live Update : अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये 7 तास विद्युतपुरवठा खंडीत

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये 7 तास विद्युतपुरवठा खंडीत झाला होता.

रात्री 8 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत तिन्ही शहरांचा वीजपुरवठा होता खंडित, तर काही ठिकाणी त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता

पडघा इथून येणारा 400 KV मुख्य लाईनचा इन्कमिंग सप्लाय ट्रिप झाल्यानं वीजपुरवठा झालेला खंडित

अखेर मध्यरात्री 3 वाजता तिन्ही शहरात वीजपुरवठा सुरू

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रानसच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रानसच्या दौऱ्यावर, आजपासून फ्रान्समध्ये एआय समिट.

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखालील पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत AI समिट-2025 च्या अध्यक्षस्थानी असतील. त्यात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्सही उपस्थित राहणार आहेत. 

फ्रेंच कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतील आणि मान्यवरांच्या डिनरला उपस्थित राहतील.

Live Update : जळगाव बाजारपेठेत मिरचीच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35 टक्यांची घसरण

जळगाव बाजारपेठेत लाल मिरचीच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35 टक्क्यांनी घसरण झाली असून भावात मोठी घसरण झाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. लाल मिरचीची निर्यात कमी झाल्याने त्याचा परिणाम मिरचीच्या भावावर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून पुढील महिन्यात नवीन मिरची बाजारात दाखल होण्याआधीच मिरचीचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Live Update : मध्यप्रदेशातील 34 मजुरांना जबरदस्तीने कामाला लावणाऱ्या 2 ठेकेदारांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल

मध्यप्रदेशातील 34 मजुरांना जबरदस्तीने कामाला लावणाऱ्या 2 ठेकेदारांवर वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील पिंपळगाव कोठवळा येथे या मजुरांची इच्छा नसताना देखील जबरदस्तीने ऊसतोडीचे काम करून घेतले जात होते. मजुरांनी विनंती करूनही त्यांना मूळ गावी जाऊ दिले जात नव्हते. मध्यप्रदेशातील जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब कळवली. त्यानंतर प्रशासनाने या मजुरांचा शोध घेऊन त्यांना मुक्त केले आहे. तसेच दोन ठेकेदारांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.