जाहिरात

मराठवाड्यात एल्गार! 288 जागांवर लढायचे की पाडायचे? मनोज जरांगेंची नवी खेळी काय?

आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढायचे की पाडायचे? याचा निर्णयही घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे.

मराठवाड्यात एल्गार! 288 जागांवर लढायचे की पाडायचे? मनोज जरांगेंची नवी खेळी काय?
जालना:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता नवा मार्ग निवडला आहे. त्यासाठी ते आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत. या रॅलीची सुरूवात शनिवारी 6 जुलैपासून सुरूवात होईल. मराठवाड्यात ही रॅली होणार आहे. त्याची सुरूवात हिंगोलीतून होणार आहे. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही रॅली निघेल असे जरांगे पाटील यांनी सांगितले.  शिवाय आरक्षण मिळत नसेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर लढायचे की पाडायचे? याचा निर्णयही घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. त्यामुळे जरांगेंचा हा नवा प्लॅन आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास कितपत यशस्वी ठरतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरक्षण शांतता रॅली काढणार 

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवाय सत्ताधारी महायुतीला त्याचा जोरदार फटकाही बसला. भाजपचे बडे नेते पराभूत झाले. मराठवाड्यात त्याचा जास्त परिणाम दिसून आला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, हे नेते पराभूत झाले. नांदेड, लातूर या हक्काच्या जागा हातातून निघून गेल्या. लोकसभा निवडणूक आता झाली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशा वेळी जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्र उपसले आहे. त्यातनच ते आरक्षण शांतता रॅली काढणार आहेत. यातून समाजाच जनजागृती करतील. समाजाने या रॅलीत सहभागा व्हावे. घरातून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे. आषाढी आणि शेतीची कामे असल्याने गर्दी कमी होईल पण यातून मराठे आपली ताकद दाखवून देतील असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

'लढायचे की पाडायचे ते ठरवावे लागेल' 

विधानसभेच्या 288 जागा लढायच्या की पाडायच्या याबाबत 13 तारखेनंतर निर्णय घेवू असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला राजकारण करायचे नाही. राजकारणाने कोणाचे भले झालेले नाही. 10 टक्के लोकांचा त्यातून फायदा होणार आहे. मग त्या 80 टक्के मराठ्यांचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे राजकारणात येण्याची इच्छा नाही. पण जर आरक्षण देणारच नसाल तर आमचा नाईलाज आहे हे सांगायला मनोज जरांगे हे विसरले नाहीत. आरक्षण मिळाले तर मराठ्यांची मुलं नोकऱ्या करतील, अधिकारी होतील, चांगल्या पदावर पोहचतील असे ते म्हणाले. त्यामुळे लढायचे की पाडायचे याचा निर्णय लवकरच घेवू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

विधानसभे आधी रण पेटवणार? 

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला. मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली. जरांगे पाटील यांनी पाडा असा संदेश दिला होता. आता जरांगे विधानसभेसाठी सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकी आधी मराठा समाजाला आरक्षण द्या, सगे सोयरेची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ते आता संपुर्ण राज्यात फिरणार आहेत. त्यातून समाजाची जनजागृती ते करणार आहेत. एकीकडे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक होत आहेत. तर दुसरीकेड ओबीसी नेत्यांनीही कुणबी प्रमाणपत्राल विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. मराठा आणि ओबीसीच्या कातरीत सरकार सापडले आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा हा खरा प्रश्न सरकार समोर आहे.    
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com