जाहिरात

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा! सज्जनगडावर मशाल उत्सवाचा उत्साह; डोळे दिपवणारी क्षणचित्रे

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा! सज्जनगडावर मशाल उत्सवाचा उत्साह; डोळे दिपवणारी क्षणचित्रे
सातारा:

फटाक्यांची आतिषबाजी.. हलगी, तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशाली... जणू काही अवघा आसमंतच प्रकाशमय झाला होता. अंधारावर प्रकाशाने मात करणारी हीच ती खरी दिवाळी पहाट असंच काहीस चित्र होतं. त्यासोबत महाराजांचा जयघोष सुरू होता. सूर्य उगवण्यापूर्वीच्या अंधारात समर्थ रामदासांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या त्या सज्जनगडावर शेकडो धगधगत्या मशाली एकामागून एक शिस्तीने येत होत्या अन् छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जयचा घोष सुरू होता.  

Latest and Breaking News on NDTV

हा यावर्षीचा पाचवा मशाल महोत्सव... बस स्थानक ते सज्जनगडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान शिंग, तूतारी, हलगी वाद्य, मर्दानी आगीचे चित्त थरारक खेळ सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

Latest and Breaking News on NDTV



गुरुवारी पहाटे ठीक साडेतीन वाजता किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त सज्जनगडावर दाखल झाले होते. आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी, एक दिवा शिव समर्थ चरणी या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पहाटे साडेतीन वाजता भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला बनघर येथील हलगी वादक यानंतर पारंपरिक पोशाखामध्ये शिंग तुतारी वादक त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची फुलांनी आणि चांदीच्या मखरांनी सजवलेली पालखी होती. यानंतर शेकडो युवक, युवती मशाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत किल्ले सज्जनगडावर येत होते.

Latest and Breaking News on NDTV

सज्जनगडावर पालखी दाखल झाल्यावर मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी असा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी परळी पंचक्रोशीतील युवक दाखल झाले होते. पालखीची मिरवणूक धाब्याचा मारुती मंदिर या ठिकाणी आल्यावर येथे चित्त थरारक असे आगीचे साहसी खेळ आयोजित करण्यात आले होते. हे आगीचे खेळ झाल्यानंतर पालखी समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिरा नजीक आणण्यात आली. याठिकाणी मर्दानी व साहसी खेळ आयोजित करण्यात आले होते. यावेळी आकाशात सुरू असलेली फटाक्यांची आतिषबाजी व शेकडो जनसमुदायासमोर सुरू असलेल्या मर्दानी खेळाने उपस्थित असलेल्या शिवसमर्थ भक्तांची दिवाळीची पहाट शिवमय झाली. मर्दानी खेळ संपन्न झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती समोर ध्येयमंत्र खड्या आवाजात म्हणण्यात आला. 

Latest and Breaking News on NDTV



वाढता प्रतिसाद...
गेल्या पाच वर्षांपासून दिवाळी पहाट निमित्त एक दिवा शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर या संकल्पनेतून दुर्गनाद प्रतिष्ठानकडून मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात येते. मात्र दरवर्षीपेक्षा अधिक मावळे गडावर दाखल होत आहेत. या कार्यक्रमास युवक पुरुष याचबरोबर महिला वर्गांचा तसेच युवतींचा सक्रिय सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. त्यामुळे मशालींची संख्याच अपुरी पडू लागली आहे हे लक्षात येताच प्रतिष्ठानकडून पुढच्या वर्षी आणखी मशाली उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

मर्दानी खेळ ठरले आकर्षण
अतित तेथील मावळा प्रतिष्ठान यांच्यामार्फत मशाल महोत्सवानिमित्त मर्दानी व आगीचे खेळ सादर केले जातात. हा खेळ या महोत्सवातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.