जाहिरात

Matheran News: माथेरान अंधारात! चूक नगरपरिषदेची शिक्षा मात्र पर्यटकांना, नक्की काय घडलं?

माथेरानचा मुख्य रस्ता अंधारात गेला आहे. यामुळे पर्यटकांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Matheran News: माथेरान अंधारात! चूक नगरपरिषदेची शिक्षा मात्र पर्यटकांना, नक्की काय घडलं?
रायगड:

मेहबूब जमादार 

मुंबई पासून सर्वात जवळचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. त्यामुळे इथे बरेच पर्यटक जात असतात. माथेरानची सर्व व्यवस्था ही तिथल्या नगरपरिषदे मार्फत पाहीली जाते. माथेरान मधल्या मुख्य रस्त्यांवरील दिव्याची सोय ही नगरपरिषदत पाहात असते.  मात्र या पथदिव्यांचे वीज बील नगरपरिषदेने भरेलचं नाहीत. त्यामुळे मोठी थकबाकी जमा झाली आहे. अशा स्थितीत महावितरणने थेट मुख्य रस्त्यांवरील दिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे माथेरानचा मुख्य रस्ता अंधारात गेला आहे. यामुळे पर्यटकांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. पर्यटकांना तर अंधारातूनच मार्ग काढाला लागत आहे. त्यामुळे माथेरान गिरीस्थान नगरपरिषद प्रशासनाचा अनागोंदी कारभार हा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत स्थानिकांकडून  नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद  नागरिकांकडून घरपट्टी गोळा करते. शिवाय पर्यटकांकडून प्रवासी कर ही वसूल केला जातो. या करातूनच नगरपरिषद पर्यटक आणि स्थानिकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवत असते. 

नक्की वाचा - Navneet Rana: 'तुझे देख के दिल मेरा धडका', या गाण्यावर नवनीत राणांचा डिस्को दांडीया, पाहा भन्नाट Video

शासन नियम व कायद्यानुसार ही जबादारी पार पाडणे हे नगरपरिषदेचे काम आहे. मात्र या कराच्या पैशाचा विनियोग हा इतर कामासाठी केला जात असल्यामुळे, माथेरान मधील मूलभूत गरजांकडे नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. नगरपरिषदेने ऑगस्ट महिन्याचे अठ्ठावीस लाख  रुपयांचे बील महावितरणकडे  भरले नाही. या पार्श्वभूमीवर 17 सप्टेंबर रोजी महावितरण कडून माथेरान नगरपरिषदेला  वीज बिल भरण्याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र माथेरान नगरपरिषदे मार्फत कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. 

नक्की वाचा - Garba Rada: गरबा खेळताना जोरदार राडा! हाणामारी, दगडफेकीनं रात्र गाजली, 63 जणांवर गुन्हे

त्यामुळे महावितरणने महात्मा गांधी रोडवरील पथदिव्यांचा वीज पुरवठा पूर्णतः खंडीत केला आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरीकांसह माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना काळ्याकुट्ट अंधारतुन मार्गक्रमण कराला लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नगरपलिकेने जीईएम पोर्टल वरून लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. कर स्वरूपात आलेला पैसा पालिका गरज नसताना खर्च करत आहे असा आरोप होत आहे.  पण स्थानिक नागरीकांसह येणाऱ्या पर्यटकांच्या मूलभूत गरजा पुरविण्यात पालिका प्रशासन मात्र कमी पडत आहे अशी चर्चा आहे. तर माथेरान नगरपरिषदेतील अधिकारी वर्ग हा आपल्या सरकारी निवासस्थानात राहत नसल्यामुळे येथील लोकांना कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे कोणतेही सोयरसुतक त्यांना नाही. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com