जाहिरात
Story ProgressBack

धक्कादायक! उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये आला, 3 दिवस बेपत्ता; थेट मृतदेह सापडला

Nashik Hospital News : पोट दुखते म्हणून औषधोपचारांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाला. पण तीन दिवसांनंतर या रुग्णाचा हॉस्पिटल परिसरातच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Read Time: 2 min
धक्कादायक! उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये आला, 3 दिवस बेपत्ता; थेट मृतदेह सापडला

Nashik Hospital News: पोट दुखते म्हणून नाशिक रोडवरील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा येथील तळघरातच संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.  शुक्रवारी (12 एप्रिल 2024) रात्री ही घटना उघडकीस आली. लेखानगरमधील भाजीविक्रेता तरुण आकाश काळे पोटदुखीवर औषधोपचार करण्यासाठी महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये 10 एप्रिलला दाखल झाला. 

रुग्ण अचानक झाला गायब

यानंतर आकाश अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली. सुरुवातीस तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यानंतर रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आकाश जीने उतरून रुग्णालयाच्या तळघरामध्ये जात असल्याचे दिसले. तळघरात पोहोचल्यानंतर नातेवाईकांना आकाश तेथे मृतावस्थेत आढळला.

तीन दिवसांनंतर रुग्णाचा आढळला मृतदेह 

तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या रुग्णाचा रुग्णालयातील तळघरामध्ये संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलीस करताहेत तपास 

नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  दरम्यान, आकाश काळेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? तो तळघरामध्ये का गेला होता? याचाही शोध पोलीस करत आहेत. 

या प्रकारामुळे रुग्णाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

आणखी वाचा

सिग्नलवर पैसे मागाल तर खबरदार! किन्नरांना चाप, वाद पेटणार?

'मी तेव्हा 8 आठवड्यांची प्रेग्नेंट होते...' चुकीच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या महिलेने फेटाळला बॉसचा माफीनामा

विद्यार्थी विद्यार्थ्याला भिडला, शिक्षिकेने तुडवला, प्रकरण पोलिसात
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination