जाहिरात

Pune News: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावानेच केला कलाकेंद्रात गोळीबार, तमाशात नाचताना राडा

याप्रकरणी बाळासाहेब मांडेकरसह इतरांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune News: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावानेच केला कलाकेंद्रात गोळीबार, तमाशात नाचताना राडा

पुणे: पुणेच्या दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली.  या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पुण्यातील एका आमदाराच्या नातलगाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दौंड परिसरातील वाखारी येथील अंबिका लोककला केंद्रात मौजमजेसाठी गेलेले भोर-वेल्हा- मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांचा बंधू बाळासाहेब मांडेकर याने 21 जुलै रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी बाळासाहेब मांडेकरसह इतरांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune News: हिंजवडी घेणार मोकळा श्वास; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMRDA ने १६६ अतिक्रमणे हटवली

अंबिका लोककला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब राजश्री अंधारे (38, रा. आनंदग्राम, वाखारी, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. शाहूनगर, वकीलवाडी, केज, जि. बीड) यांनी यवत पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व एक अनोळखी व्यक्ती 21 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता अंबिका कला केंद्र येथे आले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी आरोप केल्यावर बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी तपासाची माहिती दिली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी बापूसाहेब ढसळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि यवत पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रविण सपगुडे हेही उपस्थित होते.

Deep Amavasya 2025 Wishes: अंध:कार दूर करणारे दिवे, जीवनात घेऊन येवो तेजस्वी क्षण! दीप अमावस्येच्या पाठवा खास शुभेच्छा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com