जाहिरात

MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश

आता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे. 

MNS News: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश

रत्नागिरी: एकीकडे महापालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून मनसे नेते वैभव खेडेकर हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ते दापोलीमध्ये झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या सभेमध्येही दिसले होते. ज्यानंतर या चर्चा रंगल्या होत्या.  त्यांना शिवसेना शिंदे गटातूनही ऑफर देण्यात आली होती. अशातच आता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा आहे. 

Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय

वैभव खेडेकर यांच्यासोबतच अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी) संतोष नलावडे, (चिपळूण, रत्नागिरी) सुबोध जाधव, (माणगाव, रायगड) यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी महाराष्ट्रसैनिकांनी याची नोंद घ्यावी, हि विनंती, असं या पत्रामध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, वैभव खेडेकर हे कोकणातील महत्त्वाचे आणि मनसेचे अत्यंत निष्ठावंत नेत्यांपैकी एक होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यापासून ते पक्षामध्ये होते. त्यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. अशातच आता राज ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केली आहे. 

क्की वाचा - Emerging Business Conclave : 'तुम्ही काय केलं, ठाकरे बंधूंना सवाल'; शेलारांनी 1995 पासून कामाचा पाढाच वाचला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com