जाहिरात

Raju Patil: एकनाथ शिंदेंकडून पाहुण्यांच्या कंपन्यांना काम? 'ठेकेदारांचा नाथ' म्हणत मनसे नेत्याचे टीकास्त्र

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. एका पूलाचे पाच दिवसात होऊ शकते. तर पलावा पुलाचे काम का रखडले आहे असा सवाल उपस्थित करीत त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून ही टिका केली आहे. 

Raju Patil: एकनाथ शिंदेंकडून पाहुण्यांच्या कंपन्यांना काम? 'ठेकेदारांचा नाथ' म्हणत मनसे नेत्याचे टीकास्त्र

अमजद खान, कल्याण: मेहूण्या पाहुण्याच्या सेल कंपन्याना काम दिल्याने ठेकेदारांवर कोणताही दबाव नाही. खरं खाेटं त्या ठेकेदारांचे नाथाचे नाथ एकनाथलाच माहिती, अशी टीका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. एका पूलाचे पाच दिवसात होऊ शकते. तर पलावा पुलाचे काम का रखडले आहे असा सवाल उपस्थित करीत त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

कल्याण शीळ मार्गावरील निळजे येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. पूल रहदारीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. त्याबद्दल मनसेचे माजी आमदार पाटील यांनी अभिनंदन केले आहे. मात्र नव्याने बांधण्यात येत असलेल्या पलावा उड्डाणपूलाचे काम काम का नाही होत असा सवाल उपस्थित केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने पलावानजीक असलेल्या निळजे पूलाचे काम डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामधील रस्ता कटींग करुन रेल्वे ट्र'कचे काम पूर्ण केले. पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी या पूलावर पाच दिवसाकरीता वाहतूक बंद ठेवली होती. पूलाचे काम पूर्ण होताच पूलावरी रहदारी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अत्यंत काटेकोरपणे कामाचे नियोजन केले. वाहतूक विभागानेही चांगले काम केले. यासाठी ज्यांचे योगदान लाभले. त्यांचे अभिनंदन माजी आमदार पाटील यांनी केले आहे. हे काम नियोजित वेळेत होऊ शकते तर पलावा पूलाचे काम का होऊ शकत नाही असा सवाल माजी आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )

पलावा पूलाचे काम २०१८ मध्ये सुरु करण्यात आले. ते अजून पूर्ण होत नाही. एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएची तिजोरी कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या तिजोरीसारखी रिकामी झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले द्यायला पैसे नाहीत अशी चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अशी कामे टाटा आणि एल अ'ण्ड टी सारख्या कंपन्यांना न देता आपल्याच मेहूण्या-पाहुण्यांच्या शेल कंपन्यांना दिल्याने ठेकेदारावर कोणाचा दबाव नाही, हे देखील बोलले जात आहे. खरं खोटं त्या ठेकेदाराच्या नाथांचा नाथ एकनाथालाच माहित अशी टिका माजी आमदार पाटील यांनी केली आहे.