
मुंबई: मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सुरु झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, औरंगजेब कबरीचा वाद, छावा चित्रपट, तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मोठे आवाहनही केले.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राज ठाकरे?
"चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरातून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजाचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते," असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत.चित्रपट उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजीराजेंचे बलिदान तुम्हाला आत्ता कळलं का? विकी कौशल मेल्यावर.. " असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
"मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते. शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला.. माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात.." असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
"बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते? कशात गुंततोय आपण.." असे म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
Fraud News: 'लाडकी बहीण'नंतर लाडकी लेक... आमिष दाखवून महिलेला हजारोंचा गंडा, प्रकरण काय?
दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस राज्याकडे नीट लक्ष द्या. चांगल्या दृष्टीने पाहिलेत तर आम्हाला तुमचा पाठिंबा. प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारुन करा तरच आमचा पाठिंबा.. असे राज ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world