पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तूर्तास विधान परिषद सभापती निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. महायुतीत सभापती निवडणूक घेण्यावरून मतमतांतर असल्याने विधान परिषद सभापती निवडणूक ( Legislative Council Speaker election will not be held now) होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार जागेसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर सभापतीपदाच्या निवडीबाबत विचार केला जाईल. सभापती निवडीवरून तुर्तास एनसीपी आणि शिवसेना फारशी अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. महायुतीत सभापती निवडणूक घेण्यावरून मतमतांतरं असल्याची सूत्रांची NDTV मराठीला माहिती दिली आहे.
सभापती पदावर एकास नियुक्ती केली तर अन्य मित्र पक्ष आणि भाजपा अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे. विद्यमान उपसभापती निलम गोऱ्हे या सेनेकडून तुर्तास सर्व विधान परिषद कामकाज पाहतात. त्यामुळे सभापती निवड झाल्यास सेना आणि गोऱ्हे यांची नाराज वाढेल. राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय झाल्यावर परिषदेत भाजपा तसेच महायुती संख्याबळ अधिक भक्कम होईल, असं सांगितलं जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world