ऑपरेशन सिंदूरवर पावसाळी अधिवेशनात चर्चा सुरू आहे. सोमवारी लोकसभेत चर्चा झाल्यानंतर आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा होणार आहे. राज्यसभेत 9 तास चर्चा होईल. यादरम्यान विरोधक डोनाल्ड ट्रम्प, विदेश निती आणि युद्धबंदी या मुद्द्यांवर राज्यसभेत आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजया विरोधात गुडधे पाटील यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून 2024 मध्ये निवडणुकीत सुमारे चाळीस हजार मतांच्या अंतराने मिळालेल्या विजयाला आव्हान देणारी याचिका 4 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. आता याचिकाकर्ते आणि दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेस चे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Live Update : तुळजाभवानीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन एक ते दहा ऑगस्टदरम्यान बंद राहणार
तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन एक ते दहा ऑगस्ट दरम्यान बंद राहणार
देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद , पुरातत्व खात्याकडून काम सुरू
एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार
देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा ,अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची मंदिर संस्थानची माहिती
तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी बातमी
मे 2024 मधील पुण्यातील पॉर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचा तात्पुरत्या जामिनाचा अर्ज आज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. बिल्डर व्यवसाय करणाऱ्या या वडिलांनी आपल्या 79 वर्षांच्या आईला गंभीर प्रकृतीमुळे मणक्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे कारण देत जामिनाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र, न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता लक्षात घेऊन हा अर्ज फेटाळला. या टप्प्यावर त्यांच्या सुटकेसाठी पुरेशी कारणे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर
खासदारांची बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती
शिवाय विविध राज्यातील प्रमुखांची बैठक होणार - सूत्र
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांच्या अडचणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा दौरा
Live Update : माजी मंत्री अण्णा डांगे यांची अखेर घरवापसी
माजी मंत्री अण्णा डांगे यांची अखेर घरवापसी झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षापासून डांगे हे भाजपपासून दुरावले होते. पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Live Update : रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे थोड्याच वेळात पोलीस आयुक्तालयात जाणार
थोड्याच वेळात रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे हे पोलिस आयुक्तलयात जाणार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची घेणार भेट
प्रांजल खेवलकर यांच्यावर चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप खडसे कुटुंबाचा आहे
काल न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी प्रांजल खेवलकर याना दिली आहे
Live Update : 'जय जवान' गोविंदा पथक यंदा प्रो गोविंदा स्पर्धेच्या बाहेर
देशभरात नावाजलेल्या 'जय जवान' गोविंदा पथकाला यावेळी प्रो गोविंदा स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. प्रवेशाचे निकष आणि वेळ न पाळल्यामुळे या पथकाला बाहेर ठेवण्यात आल्याचे सांगितलं जातं. मात्र प्रो गोविंदा स्पर्धेतून जय जवान सारख्या मातब्बर संघाला बाहेर ठेवण्यासाठी वेळोवेळी नियम समितीने निकष बदलवले असा आरोप जय जवान गोविंदा पथकाने केलाय.
यासोबतच गोविंदामध्ये राजकारण आणलं जातंय. राजकारण करून हरवण्याऐवजी स्पर्धेत हरवलं असतं तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया जय जवान गोविंदा पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Live Update : 4 दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर पुढील दोन दिवस कमी होणार
गेल्या चार दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाचा जोर पुढील दोन दिवस कमी होणार
आज पासून पुढील तीन दिवस राज्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
कोकण आणि घाटमाथ्यावरती पुढील 24 तासासाठी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवली आहे.
राज्यात मात्र पाऊस आता विश्रांती घेणार असल्याची माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली
Live Update : पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, पाच वाहने एकमेकांना धडकली
पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, पाच वाहने एकमेकांना धडकली
अपघातात एकूण 7 जण जखमी
पुणे सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना
सकाळी 9 च्या सुमारास घडली घटना
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची तीन दुचाकी, एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकला धडक
धडकेनंतर कंटेनर आणि पिकअप टेम्पो पलटी
सुदैवाने जीवितहानी टळली
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात केले दाखल
अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती
पोलिसांकडून क्रेनच्या साह्याने सर्व अपघात ग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला करत, वाहतूक सुरळीत करण्यात आली
अपघातात वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान
Live Update :प्रांजल खेवलकर खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार
प्रांजल खेवलकर खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार
Fir रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार
प्रांजल हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची खोटी माहिती पोलिसांनी दिली
पुणे पोलिसांच्या विरोधात प्रांजल खेवलकर यांचे वकील ठोकणार ५० कोटी रुपयांचा दावा
पोलिसांनी केलेली कारवाई बनावट असून, प्रांजल खेवलकरांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
या विरोधात उच्च न्यायालयात खेवलकर यांचे वकील करणार याचीका दाखल
हे सगळं प्रकरण प्रांजल खेवलकर यांच्यावर ट्रॅप लावून केलं असल्याचा आरोप खेवलकर वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय
प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा खळबळ जनक दावा
ज्या महिलेचा पर्समध्ये हे कोकेन सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा खळबळ जनक दावा प्रांजल केवळकर यांची वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केलाय
Live Update : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी
सिंहगड रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण
उड्डाण पुलाच्या कामामुळे रस्ता झाला बारीक
सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
प्रशासनाचं मात्र सिंहगड रोड कडे पूर्णपणे दुर्लक्ष
रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त
अजून काही दिवस चालणार उड्डाणपुलाचं काम
Live Update : शहरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला, पोलीस तपास सुरु!
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अमेयनगर भागात 18 ते 20 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला असून सकाळी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलीचा मृत्यू हा संशयस्पद असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी काही संशयितांना देखील ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे घटनेनंतर नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, एपीआय सय्यद आणि कर्मचारी यांच्यासह श्वान पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाही केली असून पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत...
Live Update : पुण्यातून चिमुरडीचं अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातून चिमुरडीचा अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तुळजापूर मध्ये जात पुणे पोलिसांकडून 5 आरोपींना अटक
भीक मागण्यासाठी पुण्यात येत आरोपीकडून चिमुरडीच करण्यात आलं होतं अपहरण
पुण्यातील कात्रज परिसरातून 5 वर्षीय चिमुरडीच अपहरण करत तिला भीक मागायला पाडल होत भाग
एका महिलेसह 5 आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी केलं गजाआड
शहरातील 140 CCTV फुटेज तपासात पोलीस पोहोचले आरोपींपर्यंत
आरोपींकडून चिमुरडीची सुखरूप सुटका
सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०) शालुबाई प्रकाश काळे (वय ४५) गणेश बाबू पवार (वय ३५) मंगल हरफुल काळे (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून हे सर्वजण मोतीझारा, ता. तुळजापूर, जी धाराशिव येथील रहिवाशी आहेत
25 जुलै रोजी पुण्यातील कात्रज परिसरातुन करण्यात आलं होत अपहरण
Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढं ढकलण्याची शक्यता…
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढं ढकलण्याची शक्यता…
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर २० ऑगस्टला सुनावणी पार पडणार होती…
मात्र, राष्ट्रपतींच्या प्रकरणावर घटनापीठाच्या सुनावणीला १९ ऑगस्टपासून सुनावणी पार पडणार आहे…
न्यायमुर्ती सुर्यकांता हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात न्यायाधीश आहेत…
त्याचबरोबर न्यायमुर्ती सुर्यकांता यांचा राष्ट्रपतींच्या संदर्भातील घटनापीठात्मक समावेश असल्यानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
या अगोदर देखील जम्मू आणि कश्मीर मधील कलम ३७० हटवण्याच्या घटनापीठामुळं सुनावणी लांबणीवर गेली होती.
Live Update : ऑपरेशन सिंदूरबाबत भाजप देशभरात तिरंगा यात्रा
ऑपरेशन सिंदूर बाबत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार आहे.
१० ते १४ ऑगस्ट दरम्यान देशभरात तिरंगा यात्रा काढली जाईल.
संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेत पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांची भाषणे दाखविली जातील.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्व घरे आणि प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवला जाईल.
या यात्रेत सुरक्षा दलांचे आणि शहीदांचे तसेच भारताच्या संरक्षण उपकरणांचे कौतुक करणारे फलकही असतील.
देशभरातील स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्मारके, युद्ध स्मारके आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाईल.
प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिस, युद्धवीर आणि शहीदांना सन्मानित केले जाईल.
परवानगी घेऊन सीमा चौक्यांना भेट देईन आणि सैनिकांचा सन्मान करेन.
१४ ऑगस्ट रोजी, भारताच्या दुःखद फाळणीच्या स्मरणार्थ फाळणीच्या भयपट स्मृती दिनानिमित्त एक मूक मिरवणूक काढली जाईल.
तिरंगा यात्रेसाठी सर्व राज्यांमध्ये एक निमंत्रक आणि तीन सदस्यांची समिती स्थापन केली जात आहे.
राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीस सुनिल बन्सल यांना जबाबदारी देण्यात आली.
Live Update : सांगलीच्या मिरजेत दुचाकी समोर समोर धडकेत, चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू.
सांगलीच्या मिरजेत दुचाकीचा समोरा समोर धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जखमी तर उपचारादरम्यान बारा वर्षीय मुलगी अनुष्का परशुराम म्हेत्रे हिचा मृत्यू झाला आहे. आई वडील भाऊ जखमी झाले आहेत..
Live Update : तिसऱ्या दिवशी चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ...
पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणातील विसर्गाने चंद्रभागेला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच उजनी धरणातील भीमा नदीत येणारा विसर्ग 10 हजाराने कमी करण्यात आला आहे. शिवाय नीरा भीमा संगमावरील विसर्ग ही कमी झाला आहे. पंढरपूरची चंद्रभागा नदी सध्या 80 हजार क्युसेक इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे. नदीकाठच्या रहिवाशी परिसराजवळ पाणी पोहोचले आहे. मात्र आज दिवसभरात पाण्याचा प्रवाह कमी होईल. असा प्रशासनाचा अंदाज आहे.
Live Update : सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढली, अकोला जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी
अकोला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी)अकोला येथे दाखल होत आहेत. दरम्यान सध्या विशेषतः पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, विषमज्वर यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. परिणामी रुग्णालयात मोठी गर्दी होत असून औषध वाटप विभागात लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे..