जाहिरात

Satara News: 'बदली करा अन्यथा आत्महत्या..' एसटी कर्मचारी थेट डेपोच्या पत्र्यांवर चढला; साताऱ्यात तुफान ड्रामा

Satara ST Employee Protest News: "बदली करा, अन्यथा आत्महत्या करतो," असा इशारा देत महाबळेश्वर आगारातील फिटर अशोक संकपाळ यांनी हे धक्कादायक कृत्य केले.

Satara News: 'बदली करा अन्यथा आत्महत्या..' एसटी कर्मचारी थेट डेपोच्या पत्र्यांवर चढला; साताऱ्यात तुफान ड्रामा

राहुल तपासे, सातारा:

Satara MSRTC ST Employee Protest:  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे आज एक विचित्र घटना घडली. बदलीसाठी अर्ज केलेल्या एका कर्मचाऱ्याने थेट बसस्थानकाच्या पत्र्यावर चढून आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे, हे आंदोलन त्याने भर पावसात केले. "बदली करा, अन्यथा आत्महत्या करतो," असा इशारा देत महाबळेश्वर आगारातील फिटर अशोक संकपाळ यांनी हे धक्कादायक कृत्य केले.

अचानकपणे बसस्थानकाच्या पत्र्यावर चढलेल्या या आंदोलनामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. सर्वत्र गोंधळ आणि धावपळ सुरू झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पोलीस आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. हा प्रकार सुमारे एक ते दोन तास सुरू होता आणि त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Latest and Breaking News on NDTV

यादरम्यान, अशोक संकपाळ यांना समजावण्यासाठी सहकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संकपाळ यांना शांत राहण्याचे आणि खाली उतरण्याचे आवाहन केले. अखेरीस, सहकारी कर्मचारी आणि कुटुंबीयांनी केलेल्या मनधरणीनंतर संकपाळ खाली उतरले आणि त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, भर पावसात झालेल्या या आंदोलनामुळे महाबळेश्वर बसस्थानकात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. या अनोख्या आंदोलनाची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com