जाहिरात

Kabutar Khana News: कबुतरांना खाद्य कसे द्यावे? मुंबई महापालिकेने मागवल्या सूचना, तुमचे मत कसे नोंदवाल?

२९ ऑगस्ट  दरम्यान हरकती / सूचना नोंदवाव्यात असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना आवाहन केलं आहे. 

Kabutar Khana News: कबुतरांना खाद्य कसे द्यावे? मुंबई महापालिकेने मागवल्या सूचना,  तुमचे मत कसे नोंदवाल?

मुंबई: मुंबईमधील कबुतरखान्यांचा वाद दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत, त्याविरोधात पालिकेकडूनही कारवाई केली जात आहे. याबाबत आता पालिकेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे द्यावे? यासाठी नागरिकांनी सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट  दरम्यान हरकती / सूचना नोंदवाव्यात असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना आवाहन केलं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील कबुतरखान्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील, अॅनिमल अँड बर्डस् राईटस् अॅक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हे तिनही अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत. 

Raj Thackeray: 'लोढा- बिढा एका समाजाचे मंत्री नाहीत, कारवाई झालीच पाहिजे...', राज ठाकरेंची थेट भूमिका

नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जांचे अवलोकन करुन कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत  त्यांच्या हरकती / सूचना  suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

तसेच, सदर हरकती / सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२' येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Dadar kabutar Khana News: कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com