जाहिरात

Nagpur News : नागपूर-नाशिकनंतर आता नागपूर-कोल्हापूर विमानसेवा बंद; अवघ्या 2 महिन्यात गाशा गुंडाळला

Nagpur News : नागपूर-नाशिकनंतर आता नागपूर-कोल्हापूर विमानसेवा बंद; अवघ्या 2 महिन्यात गाशा गुंडाळला

Nagpur to Kolhapur Airline : आंतरजिल्ह्यातील प्रवास करणं सोपं जावं यासाठी अनेक जिल्हे विमानसेवेद्वारे जोडले जात आहेत. नागरिकांना सोईसुविधा मिळाव्यात आणि त्यांना प्रवासासाठी लागणारा वेळ कमी व्हावा यादृष्टीने राज्यातील अनेक जिल्हे विमानसेवेने जोडले जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान नागपूरशी अनेक जिल्हे जोडणाऱ्या विमानसेवा दोन महिन्यातच बंद (Nagpur to Kolhapur Airline Closed) करण्याची वेळ आली आहे. मे महिन्यात सुरू झालेली नागपूर–कोल्हापूर विमानसेवा केवळ दोनच महिन्यांत बंद पडली आहे. स्टार एअर तर्फे दोन महिन्यांपूर्वी नागपूर ते कोल्हापूर अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली होती. आठवड्यातून सोमवार, शुक्रवार आणि रविवारी ही विमानसेवा कोल्हापूरसाठी उड्डाण करत असे. विशेषत: कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता.

मात्र केवळ दोन महिन्यांच्या कालावधीतच ही सेवा एअरलाईन कंपनीकडून अचानक बंद करण्यात आली आहे. यापूर्वी नागपूर ते नाशिक, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ते लखनऊ या विमानसेवाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता नागपूर ते कोल्हापूर विमानसेवाही बंद करण्यात आल्या आहेत. 

नक्की वाचा - नागपूर-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वेचा मुहूर्त ठरला, प्रवाशांचे 3 तास वाचणार; कधीपासून सुरू होणार?

गाशा का गुंडाळला?

सुरुवातीचे काही दिवस नागपूर ते नागपूर विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. कोल्हापूर देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी नागपुरकरांकडून उत्साह होता. मात्र कालांतराने कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण कमी झालं आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने एअरलाईन कंपनीकडून ही सेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com