जाहिरात

Big News : नागपुरातून मोठी बातमी; 2 वर्षात जन्मदरात तब्बल 56 टक्क्यांनी घट

राज्यभरात गर्भ लिंग निदान चाचण्यांवर प्रतिबंध असताना नागपुर शहरातून जन्मदरात मोठी घट पाहायला मिळत आहे. 

Big News : नागपुरातून मोठी बातमी; 2 वर्षात जन्मदरात तब्बल 56 टक्क्यांनी घट

संजय तिवारी, प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीत जन्मदर 2 वर्षांत 56 टक्क्यांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात जन्म दरात आणि लिंग गुणोत्तर प्रमाणात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2022 ते 2024 दरम्यान 56 टक्के जन्म दराची घट पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेकडून यासंदर्भातील महिती समोर आली आहे. 

स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात देखील पिछेहाट झाली आहे. वर्ष 2023 मध्ये नागपूर शहरात प्रत्येक एक हजार पुरुषांवर 962 महिला आहेत. तो एकाच वर्षात 2024 मध्ये 923 इतका खाली आला होता. या वर्षी मार्च महिन्यात हा आकडा आणखी खाली आला आहे. सद्यस्थितीत एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 917 वर घसली आहे. नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेने 2022 मध्ये 1.32 लाख जन्मदाखले दिले होते. 2023 मध्ये याच किंचितशी घट झाली आणि हा आकडा 1.29 लाखांपर्यंत पोहोचला.

Nagpur News : डास तपासणीसाठी पदवीधर-पदव्युत्तर उमेदवारांचे अर्ज, बेरोजगारीचं भीषण वास्तव

नक्की वाचा - Nagpur News : डास तपासणीसाठी पदवीधर-पदव्युत्तर उमेदवारांचे अर्ज, बेरोजगारीचं भीषण वास्तव

माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अभय कोलारकर यांनी याबाबत मिळवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. राज्यभरात गर्भ लिंग निदान चाचण्यांवर प्रतिबंध असताना जन्मदरात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय स्वयसेवक संघातर्फे हिंदूंचे जन्मदर कमी होत असल्याच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जात असून स्वतः सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि संघाच्या अन्य नेत्यांनी या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांत भाष्य केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com