जाहिरात

Nagpur News: बच्चू कडुंच्या ट्रॅक्टर रॅलीचा नागपुरात महाएल्गार! 'या' महामार्गावरील वाहतूक वळवली, वाचा डिटेल्स

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सुमारे शंभरहून अधिक ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शहराच्या हद्दीत प्रवेश करणार आहेत.

Nagpur News: बच्चू कडुंच्या ट्रॅक्टर रॅलीचा नागपुरात महाएल्गार! 'या' महामार्गावरील वाहतूक वळवली, वाचा डिटेल्स

नागपूर: माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे 'ट्रॅक्टर वादळ आज, मंगळवार (२८ ऑक्टोबर) रोजी नागपूर शहरात धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सुमारे शंभरहून अधिक ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शहराच्या हद्दीत प्रवेश करणार आहेत. या आंदोलनाद्वारे ते शेतकरी नेते म्हणून आपली नवी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या 'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलना'साठी पोलिसांनी केवळ एक दिवसाची परवानगी दिली असली तरी, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाप्रमाणेच हा 'ट्रॅक्टर एल्गार महामोर्चा' रेंगाळण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर नागपूर-वर्धा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी (Traffic Congestion) करण्यासाठीच ट्रॅक्टर आणले जात असल्याचे उघडपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर काही कार्यकर्ते अमरावती-नागपूर मार्गाने शहरात येऊन रस्ता रोकोचा (Rasta Roko) प्रयत्न करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Pune News: ATS ची मोठी कारवाई! कोंढव्यात अल कायदाच्या संशयीत दहशतवाद्याला अटक

हे आंदोलन चिघळण्याची किंवा दीर्घकाळ चालण्याची शक्यता स्वतः पोलिसांनीच व्यक्त केली आहे. नागपूर वर्धा मार्गावर मौजा परसोडी येथे मिडास हॉस्पिटलजवळ आंदोलनाचे ठिकाण निश्चित केले आहे. या आंदोलनादरम्यान अंदाजे वीस ते पंचवीस हजार (२०,००० ते २५,०००) महिला-पुरुष सहभागी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी एकच दिवसाची परवानगी दिली असली तरी, वाहतूक उपायुक्त लोहित मतानी (Lohit Matani) यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेत, 'आंदोलन संपेपर्यंत' (Until the protest ends) वाहतूक वळविण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे हे आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता स्पष्ट होत आहे.

नक्की वाचा - Satara Doctor Case: दोघांशी ही संबंध, लॉजचा रुमही स्वत:बुक केला, चौकशीत धक्कादायक खुलासे

वाहतुकीत मोठे बदल लागू: 

नागपूर-वर्धा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कोणताही गंभीर अपघात होऊ नये यासाठी मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून आंदोलन संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात आली आहे:

वर्धा ते नागपूर वाहतूक: जामठा चौकी येथून डावे वळण घेऊन एन.सी.आय.कडे वळविण्यात येईल. पुढे यु-टर्न घेऊन मेट्रो रेल्वे यार्ड, सिमेंट फॅक्टरी, डी.पी.एस. स्कूल टी पॉईंट, मिहान डब्ल्यू बिल्डिंग आणि पुढे पुलावरून खाली उतरून इंडियन ऑइल कंपनी, खापरी पोलीस चौकी मार्गे नागपूरकडे जातील.

नागपूर ते वर्धा वाहतूक: खापरी पोलीस चौकीसमोरून डावे वळण घेऊन ही सेझ मिहान पूल सर्व्हिस रोडने डावे वळण घेऊन, हॉटेल ली मेरीडीयन, पांजरा गाव, आऊटर रिंगरोड पुलावरून उजवे वळण घेऊन पांजरी टोलनाका डावे वळण घेऊन वर्धाकडे जातील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com