जाहिरात

Pune News: ATS ची मोठी कारवाई! कोंढव्यात अल कायदाच्या संशयीत दहशतवाद्याला अटक

महाराष्ट्र एटीएसने पुण्याच्या कोंढवा भागातून जुबेर हंगरकर या व्यक्तीला UAPA अंतर्गत अटक केली आहे.

Pune News: ATS ची मोठी कारवाई! कोंढव्यात अल कायदाच्या संशयीत दहशतवाद्याला अटक
पुणे:

अविनाश पवार 

महाराष्ट्र ATS ने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढव्यातून एका संशयीत दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. याचा थेट Al Qaeda या दहशतवादी संघटनेशी संबंध होता असा संशय आहे. झुबेर हंगरकर असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या व्यक्तीवर UAPA अंतर्गत कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याचा संबंध Al Qaedaशी असल्याची माहिती समोर येत आहे. 

नक्की वाचा - Satara Doctor Case: दोघांशी ही संबंध, लॉजचा रुमही स्वत:बुक केला, चौकशीत धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र एटीएसने पुण्याच्या कोंढवा भागातून जुबेर हंगरकर या व्यक्तीला UAPA अंतर्गत अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, एटीएसने ही कारवाई करण्यापूर्वी याभागावर नजर ठेवली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर छापे ही टाकले होते. यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संदिग्ध साहित्य व दस्तऐवज जप्त करण्यात आले होते. त्यावरून एटीएस झुबेर हंगरकर पर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अडचणीत! 4285 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार? काय आहे कारण?

अटक झालेल्या आरोपीचा संबंध अल-कायदाशी असल्याचे एटीएस सुत्रांनी सांगितले आहे. ही कारवाई राज्यातील दहशतवाद आणि आतंकी नेटवर्कच्या बाबतीत महत्वाची मानली जात आहे. या अटकेमुळे मोठ्या घातपाताचा डाव उधळण्याचंही बोललं जात आहे. चौकशी अंता याबाबत आणखी खुलासे एटीएस करू शकते. पण पुण्या सारख्या ठिकाणी दहशतवादी कार्यरत असल्याने  सर्वत्र खळबळ उडाली आहे. एटीएसला मिळेलेलं हे मोठं यश आहे असं मानलं जात आहे. मात्र चौकशीत काय खुलासे होतात याकडे आत सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com