जाहिरात

Nagpur News : नागपुरात वाढत्या उन्हाचा कहर; महाविद्यालयांसह कामगारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर उपाययोजना

नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

Nagpur News : नागपुरात वाढत्या उन्हाचा कहर; महाविद्यालयांसह कामगारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कठोर उपाययोजना

Nagpur News : नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुपारच्या सत्रात कोचिंग क्लासेस घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कामगारांनाही विश्रांती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत क्लास घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कोचिंग क्लासेसचे वर्ग सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. उद्योग कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी दुपारी 11 ते 4 या वेळात विश्रांती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागपूरमध्ये 'हीट अॅक्शन प्लॅन'

  • दुपारी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी
  • कोचिंग क्लासेस सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश
  • विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करावी
  • महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं
  • कारखाने, बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना दुपारी 11 ते 4 या वेळेत विश्रांती द्यावी
  • काम अत्यावश्यक असेल तर सावलीसाठी शेड आणि थंड पाण्याची व्यवस्था करावी
  • रुग्णालयातही हीट ॲक्शन प्लान सज्ज ठेवण्याचे आदेश

नक्की वाचा - Watermelon Death: रात्री खाल्लं कलिंगड, सकाळी चिमुरडा मृतावस्थेत; एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीवन-मरणाशी संघर्ष

विदर्भात तापमानाचा पारा वाढलेलाच

अकोला – 45.4

अमरावती – 46.0

वर्धा – 46.0

नागपूर – 43.8

बुलढाणा – 41.0

चंद्रपूर – 43.6

गोंदिया – 42.2

गडचिरोली – 42.6

यवतमाळ – 45.2

वाशिम – 43.2

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com