जाहिरात
6 months ago

PM Oath Ceremony: "मैं नरेंद्र दामोदर दास मोदी..." नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi)  तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनामध्ये भव्य समारंभामध्ये त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. 

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर रत्नागिरी, कल्याण, भंडारा, धुळ्यातही भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष 

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथविधी घेतल्यानंतर नंदुरबार शहरातील फटाक्यांची आतिषबाजी. एकमेकांना पेढ भरवून आनंद केला साजरा.

 

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जळगाव भाजपा कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन 

पुणे : भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला साजरा

पीयूष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

हिंगोलीतील वसमत येथे मोदी समर्थकांचा जल्लोष

नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच मिरवणूक काढत केली घोषणाबाजी

फटाक्यांची आतषबादी करून तरुणांनी जल्लोष केला साजरा

Modi 3.O Cabinet: नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली 

"मी एनडीए सरकारसोबत पुढील 5 वर्षे पाहत आहे. सरकारने गेल्या 10 वर्षांत काम केले आहे. मी बदल पाहिला आहे... भारत हा मोठा देश आहे आणि बदल एका रात्रीत होत नाही, त्यासाठी वेळ लागतो"- विक्रांत मेसी, अभिनेता

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा घेतली शपथ 

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यावर गायिका अनुराधा पौडवाल म्हणाल्या की,' हा अभिमानाचा क्षण आहे, देशामध्ये बदल घडवून आणणे ही फार मोठी गोष्ट आहे".

नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पंतप्रधानपदाची शपथ घेणार 

"कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्या नावाची राष्ट्रपतींकडे शिफारस केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे." - जी किशन रेड्डी 

प्रफुल पटेल यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार भाजप कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी येथे दाखल झाले आहेत. - प्रसाद लाड, आमदार 

140 कोटी भारतीय नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्राला 6 मंत्रिपदे मिळाली आहेत. महाराष्ट्रासाठी ही मोठी गोष्ट आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

"मी भाग्यवान आहे की मला मोदींच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली". - मुरलीधर मोहोळ, खासदार 

कॅबिनेट मंत्रिपदासाठी आम्ही थांबायला तयार - अजित पवार 

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- यूपीए सरकारमध्ये प्रफुल पटेल कॅबिनेट मंत्री होते

- आम्ही राज्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली  

- आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे आहे  

- आम्ही शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होणार 

- शनिवारी रात्री जे.पी.नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली 

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया 

- केंद्रीय  मंत्रिमंडळत सर्वांना सामवून घेण्याचे भाजप नेतृत्वाचे धोरण आहे. 

- महायुतीतील घटक पक्षांना सामवून घेण्याची भाजपचे धोरण आहे.

- आज जरी शपथविधीमध्ये राष्ट्रवादीचे नाव नसेल पण भविष्यात राष्ट्रवादीला संधी मिळू शकते.

नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली 

राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले होते, पण त्यांनी ते नाकारले. कारण प्रफुल पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते

शिवसेना नेते (UBT) सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

-आता अनेक जणांसोबत भाजपला तडजोड करावी लागणार आहे 

- राष्ट्रवादीची चर्चा देखील मंत्री पदासाठी होत नाहीय 

- देशभरात मतांची संख्या आणि टक्केवारीची संख्या विरोधी पक्षांची मोठी आहे 

- त्यामुळे भाजपसाठी कसोटीच राहणार आहे 

 - प्रफुल पटेल यांना संकेत दिले होते, मात्र मंत्रिपद मिळत नसेल तर आश्चर्याची गोष्ट आहे 

रोहित पवार यांची प्रतिक्रिया  -

- जे नेते साहेबांना सोडून गेले त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळाले आहे 

- प्रफुल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिलंय, ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली जी अटॅचड केली होती. त्यामुळं मंत्रिपद मिळाले नाही, तर व्यक्तिगत गिफ्ट मिळाले. 

- आता जे साहेबाना सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढावं लागेल 

- नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळ स्थान नाही.

- भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती.

- नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाही.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात नितेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता

Modi 3.0 : मराठवाड्याच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिमंडळात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या रूपाने दोन मंत्री मिळाले होते.  मराठवाड्यातून महायुतीचा एकमेव उमेदवार संदिपान भुमरे निवडून आले आहेत. मात्र त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्याचे नेतृत्व करणारे एकही मंत्री नसणार नसल्याची चर्चा आहे.

Breaking :

- एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट देणे शक्य नसल्याने मंत्रिमंडळातील सहभाग लांबणीवर 

- राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक उमेदवार

- एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून देखील त्यांना केवळ एक राज्यमंत्रिपद मिळत असल्याने दुसरीकडे केवळ एक खासदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद कसे द्यायचे? महायुतीसमोर प्रश्न उपस्थित 

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रिपद देण्यातही महायुतीला अडचण, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्रिमंडळात सहभाग नाही

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाल्यास घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता. कारण देशात एक सदस्य निवडून आलेले 7 पक्ष आहेत

Narendra Modi 3.0 | दिल्लीत मोदींचा शपथविधी, पाहा कशी आहे एकूण सुरक्षा व्यवस्था...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास  मंत्रिपद नाही, अजित पवारांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचा तितका मित्रपक्ष म्हणून फायदा न झाल्याने मंत्रिपद दिले नाही का? अशी चर्चा सुरू 

आगामी काळात राज्यात NCP आणि महायुतीत वाद वाढणार की मार्ग मोकळे होणार ? याकडे लक्ष  

जळगाव : रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची घोषणा होताच मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष 

- कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व लाडू वाटून साजरा केला जल्लोष 

रक्षा खडसेंना मिळाले मंत्रिपद, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया 

- माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले, त्यातील अत्यंत आनंदाचा क्षण 

- गेले अनेक वर्षे केलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे 

- रक्षा खडसे यांना आज शपथविधीसाठी बोलावले, हाच सर्वात मोठा आनंद आहे 

- मतदारांनी तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवला आणि दिल्लीपर्यंत पोहोचवले त्यामुळे मतदारांचे देखील आभार मानतो 

 

- रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची ऑफर मिळताच एकनाथ खडसे तातडीने दिल्लीकडे रवाना 

- शपथविधीनंतर एकनाथ खडसे यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता

राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात झळकले मोदी 3.0 चे पोस्टर्स 

रामदास आठवले प्रतिक्रिया, म्हणाले...

- मोदींची आहे आंधी, म्हणून मला मिळाली संधी 

- आगामी काळात विधानसभेत आम्ही चांगले काम करू 

- संविधान बदलणार हा त्यांचा खोटा फसवा मुद्दा आता चालणार नाही

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन 

शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांना फोन आलेला नाही

- शपथविधी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण- सूत्र

- महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देत केला होता प्रचार 

- पण पुण्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्याने राज ठाकरे दिल्लीला जाणार नाहीत

महाराष्ट्रातील 5 खासदारांना PMOमधून फोन 

1) नितीन गडकरी 

2) पियूष गोयल

3) रक्षा खडसे 

4) रामदास आठवले 

5) प्रतापराव जाधव

Ramdas Athawale | रामदास आठवले घेणार मंत्रिपदाची शपथ, शपथविधीआधी आठवले NDTV मराठीवर

महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव, भाजपचे नितीन गडकरी, भाजपचे पीयूष गोयल शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com