जाहिरात

भोंदूबाबाचं घृणास्पद कृत्य समोर आणणारा नीरज जाधव कोण? खरात अन् पीडितेचा आणखी एक भयाण कारनामा उघड

कॅप्टन खरातला अटक झाल्यानं शिर्डीत अनेक हस्तक धास्तावले असून मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

भोंदूबाबाचं घृणास्पद कृत्य समोर आणणारा नीरज जाधव कोण? खरात अन् पीडितेचा आणखी एक भयाण कारनामा उघड

Ashok Kharat Case : महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक खरातचे घृणास्पद व्हिडिओ समोप आणणाऱ्या नीरज जाधवला अडकवण्यासाठी शिर्डीतील महिलेला हाताशी धरत खोटी फिर्याद दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. नीरज जाधवला अडकवण्यासाठी शिर्डीतील महिलेला हाताशी धरत खोटी फिर्याद दाखल केल्याची माहिती आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत अनेक विसंगती असल्यानं हा सर्व महाप्रताप आरोपी कॅप्टन खरातचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवमुळे प्रकरणाचा पर्दाफाश... (Who is Neeraj Jadhav?)

12 मार्च रोजी शिर्डीत एका तरुणीने अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकी प्रकरणात अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव नावाच्या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली. नीरज हा खरातच्या कार्यालयात काम करायचा. काही वृत्त माध्यमांतून तो खरात यांचा ऑफिस बॉय होता. नीरजने खरात आणि तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते, असं तपासात समोर आलं. ते फोटो पाठवून तो तरुणीला ब्लॅकमेल करायचा. पीडितेनं याप्रकरणी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस तपासात नीरजकडे अनेक व्हिडीओ सापडले. त्यानंतर अन्य एका महिलेनं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर नाशिक क्राईम ब्रँच एका खंडणी प्रकरणाचाही तपास करत होते.

पीडित महिला अन् खरातमध्ये कोटींचा व्यवहार...

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आली आहे. नीरज जाधवला अडकवण्यासाठी शिर्डीतील महिलेला हाताशी धरत खोटी फिर्याद दाखल केल्याची माहिती आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत अनेक विसंगती असल्यानं हा सर्व महाप्रताप आरोपी कॅप्टन खरातचा असल्याचं सांगितलं जात आहे.  संबंधित तथाकथित पीडित महिलेच्या कुटुंबासोबत आरोपी अशोक खरातचा कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आणण्यात अहिल्यानगर पोलिसांचा मोठा सहभाग होता. 

नक्की वाचा - Ashok Kharat News : मर्चेंट नेव्हीचा कॅप्टन ते ज्योतिषी; अशोक खरातच्या SIT तपासात हैराण करणारे खुलासे


अशोक खरात आणि संबंधित महिलेनं संगनमताने नीरज जाधव विरोधात दाखल केलेली फिर्याद भोंदूबाबा खरातवर उलटल्याचं दिसून येत आहे. भोंदूबाबाने अनेक महिलेंवर अत्याचार केला आहे. शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक महिला आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरातच्या शिकार झाल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कॅप्टन खरातला अटक झाल्यानं शिर्डीत अनेक हस्तक धास्तावले असून मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com