शुभम बायस्कार
भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून जबरदस्त शाब्दीक लढाई सुरू झाली आहे. नवनीत राणा यांनी हिंदूंना 3 ते ४ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. यावरून टीका करताना ओवैसी यांनी म्हटले होते, तुम्हाला कोणी अडवले आहे, मी 6 मुलं जन्माला घातली आहेत. यावरून नवनीत राणा भडकल्या असून त्यांनी औवैसी यांना किडा म्हणत त्यांना पाकिस्तानात हाकला असे विधान केले आहे.
नक्की वाचा: Navneet Rana : 'तर आपण एका मुलावर का समाधानी राहायचे?'; नवनीत राणांनी मांडला लोकसंख्येचा नवा फॉर्म्युला
नवनीत राणांचे औवैसींना सवाल
हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालावीत असे विधान माजी खासदार नवनीत राणा यांनी केले होते. यावर बोलताना औवैसी यांनी म्हटले होते की, भारताचा एकूण प्रजनन दर (TFR) झपाट्याने घटत आहे आणि मुस्लिमांचा प्रजनन दर सर्वाधिक वेगाने कमी होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात देशात वृद्धांची संख्या अधिक होईल. केवळ धार्मिक राजकारण करण्यापेक्षा देशाच्या 'डेमोग्राफिक डिव्हिडंड'चा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी म्हटले की, "ते ज्येष्ठ खासदार आहेत, देशाच्या संविधानाला पुढे ठेवणार का इस्लामला पुढे ठेवणार? यावर औवैसी यांनी म्हटले की इस्लामला पुढे ठेवू. औवैसींना भारत माता की जय, वंदे मातरम म्हणायला लाज वाटते. मी म्हटले की हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालायला हवी, त्यावर औवैसी म्हणतात की मला 6 मुलं आहेत आणि 19 मुलं जन्माला घालणाऱ्या मौलानाला भेटायला जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांची संख्या कशी वाढली ते सांगा, मुंबईत यांची संख्या कशी वाढली ते सांगा, आसाममध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली ते सांगा. "
नक्की वाचा: PMC Election 2026: 'हाच का दादांचा वादा?' सभेआधी अजित पवारांना 3 बोचरे सवाल; बॅनरमुळे राजकारण तापलं
औवैसींचे नागरिकत्व काढून घेण्याची मागणी
नवनीत राणा यांनी पुढे म्हटले की, औवैसींनी भारत माता की जय म्हणावे, आम्ही 10 मुलं जन्माला घालायला तयार आहोत. औवैसींचे नागरिकत्व काढून घेणे गरजेचे असून देशाबाहेर फेकून द्यायला हवे. पाकिस्तानात 10-20 मुलं जन्माला घातली तरी त्यांना कोणी विचारणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world