सागर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, पुणे: 'राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभांचा धडाका सुरु आहे. या सभांमधून राज ठाकरे प्रामुख्याने शरद पवारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. शरद पवार जातीयवादी आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्षांचा हा दावा खोडत काढत राज ठाकरेंवर सडकून टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी आयुष्यात कधीही जातीचा विचार केला नाही, करणारही नाही. ज्यांनी आरोप केले त्यांच्याबद्दल मी काही भाष्य करु इच्छित नाही. उभ्या आयुष्यात त्यांचे योगदान काय आहे. उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी लोकांना नावे ठेवणे, टिका-टिप्पणी नावे ठेवण्याशिवाय नकला करणे याशिवाय त्यांनी काही केले नाही, असा खणखणीत टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. तसेच मी फुलेंची पगडी घातली याचा अर्थ त्यांची विचारधारा मानतो. फुलेंच्या विचारधारेच्या पुरस्कारासंदर्भात मी अनेकदा बोललो, त्याला विरोध करणाऱ्यांबद्दलही मी अनेकदा बोललो. त्यांचे विचार मी तरुणांना सांगत असतो, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
नक्की वाचा: कांद्याला भाव द्या! ठाकरे म्हणतात, अरे काश्मीरमधलं 370 कलम हटवलंना, सभेत काय घडलं?
यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याबद्दलही एक महत्वाचे विधान केलेमाझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक रोष नाही. त्यांचे वडील गंगाधर माझे चांगले मित्र होते, त्यावेळी देवेंद्र लहान होते. पण माझ्या त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली, काही गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या. त्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यामध्ये मी सगळ्यांबद्दल मी बोलत नाही. स्वच्छ प्रशासन देण्याची इच्छा होती,अशी जनतेत भावना होती, ती चुकीची नाही. आता ज्यांना ते प्रोत्साहित करतात त्यांच्याबद्दल मी बोललेलो नाही', असे म्हणत शरद पवार यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील कामगिरीचे कौतुकच केले.
महत्वाची बातमी: शरद पवारांच्या खेळीने आंबेगावातील सत्तापालट होणार? गुरू विरुद्ध शिष्य रंगलाय सामना!