विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाक युद्ध सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांची कश्मीर मधील कलम 370 वरून खिल्ली उडवली. अमित शाह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कश्मीरच्या कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यावरून बोलताना ठाकरे यांनी महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. त्याला कलम 370 पेक्षा त्याची कर्जातून मुक्तता कधी होणार? त्याच्या शेती अवजारावरील जीएसटी कधी माफ होणार याची चिंता आहे. त्यावर अमित शाह यांनी बोलले पाहीजे असे ठाकरे यावेळी म्हणाले. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचाराला ते आले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे यांची सभा होती. सभे दरम्यान ते महाविकास आघाडीचे सरकार आल्यास काय काय देणार याचा पाढा वाचत होते. त्याच वेळी एक शेतकरी उभा राहीला. तो जोरजोरात एक मागणी करत होता. ठाकरेंनी आपलं म्हणणं पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याला तुझी काय मागणी आहे अशी विचारणा केली. शेतकरी म्हणत होता कांद्याला भाव द्या. हाच धागा पकडत ठाकरे म्हणाले, काही वेळा साठी तुम्ही मला अमित शाह समजा. तुम्हाला कांद्याला भावा हवाय, अरे पण काश्मीरमधलं 370 कलम हटवलं ना. कापसाला भाव हवाय. सोयाबिनला भाव पाहीजे. अरे पण काश्मीरचं 370 कलम उठवलंना. असं म्हणत ठाकरे यांनी अमित शाह यांची खिल्ली उडवली.
ट्रेंडिंग बातमी - सातारा जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अमित साह काश्मीरच्या कलम 370 चा मुद्दा वारंवार मांडत आहेत. त्यावर ठाकरे म्हणाले राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना मालाला भाव मिळत नाही. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. शेती अवजारांवर मोठ्या प्रमाणात जीएसटी आहे. ते हटणार का याची चिंता शेतकऱ्याला आहे. मात्र त्याबाबत कोणी काही बोलत नाही. फक्त कश्मीरमधील कलम 370 बद्दल बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाह यांनी कश्मीर सोडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याबद्दल बोलावे असे ठाकरे म्हणाले. शिवाय कश्मीर मधील कलम 370 कलम शिवसेनेचा पाठिंबा होता म्हणून हटवता आलं असेही ठाकरे यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
ज्यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवण्याला विरोध केला त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसले आहेत असंही अमित शाह म्हणाले होते. त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला. तुम्हाला राजकारणात गाडण्यासाठी त्यांच्या बरोबर गेलो आहे असे उद्धव यावेळी म्हणाले. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. त्यांच्या कांद्याला भाव नाही. सोयाबीन आणि कापसाची स्थितीही तिच आहे. मविआने शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे काही निर्णय हे शेतकऱ्याच्या विरोधात घेतले. गुजरातच्या कांदा उत्पादकांसाठी एक निर्णय आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसरा निर्णय घेतला गेला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 83 वर्षाचा उमेदवार! 'या'मतदार संघात हाच मुद्दा ठरतोय प्रचाराचा मुद्दा
दरम्यान या सभेत त्यांनी मविआमध्ये श्रीगोंदा मतदार संघात झालेल्या बंडखोरीबद्दलही वक्तव्य केलं. ही बंडखोरी नसून ही गद्दारी आहे असं ठाकरे म्हणाले. या मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभेला या मतदार संघात निलेश लंकेंना मदत केली. त्यामुळे अशक्य असलेला विजय शक्य करून दाखवला. आता लंकेंनी विधानसभेला आम्हाला मदत करावी. अपशकून करू नये. आघाडीचा धर्म पाळावा. काहींना मविआचं सरकार येवू नये असा प्रयत्न आहे. त्यासाठी अशी बंडखोरी केली जात आहे. अजूनही वेळ गेली नाही असंही ते या निमित्ताने म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world