जाहिरात

Satara Politics: 'दाल में कुछ तो काला है.., 'सह्याद्री'च्या विजयानंतर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं!

बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा 21- 0 च्या फरकाने धुव्वा उडवला. या निकालानंतर शरद पवार गटाने घोरपडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Satara Politics:  'दाल में कुछ तो काला है.., 'सह्याद्री'च्या विजयानंतर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं!

राहुल तपासे, सातारा: सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकहाती सत्ता खेचून आणला. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा 21- 0 च्या फरकाने धुव्वा उडवला. या निकालानंतर शरद पवार गटाने घोरपडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सत्ता असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. बाळासाहेब पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बाळासाहेब पाटील यांच्यासमोर विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांचे आव्हान होते. मात्र बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने या दोन्ही पॅनेलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता खेचून आणली. 

या निवडणुकीत तब्बल 70 उमेदवार रिंगणात होते. ज्यामध्ये  बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलने कारखान्याच्या संचालकाच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत साडेसात ते आठ हजाराच्या मतांनी विरोधकांना धुळ चारली. या विजयासोबतच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मरगळलेल्या बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे तसेच विरोधक एकवटले तरी सह्याद्रीवर मात्र आपलीच सत्ता चालणार असा थेट संदेशच त्यांनी विरोधकांना दिला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Latur News: अडीच वर्ष गुंगारा दिला, पोलीस येताच गटारात लपला, पुढे जे झालं ते...

दरम्यान, बाळासाहेब पाटील यांच्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. '4 महिन्यापूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही.पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील...' असा टोला त्यांनी लगावला आहे. 

तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या निकालावरुन भाजपला डिवचले आहे. 'सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आमचे सहकारी, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! विधानसभा निवडणुकीत EVM च्या मदतीने ४४ हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा आमदार बॅलेट पेपर वर घेतलेल्या या निवडणूकीमध्ये पैशाचा पाऊस पाडूनही निम्मी मते देखील घेऊ शकला नाही. दाल में कुछ तो काला है, असं ते म्हणालेत.

ट्रेंडिंग बातमी -  Shivsena News: 'बाळासाहेब गेले त्याच वेळी शिवसेना संपली', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वाद उफाळणार?