महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड? सगळ्यांच्या नजरा शरद पवारांवर

12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पवारांचे पुतणे अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काका-पुतण्याचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

राहुल कुलकर्णी, मुंबई: 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी त्यांच्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काका पुतण्यामध्ये जी कटुता निर्माण झाली होती, ती पाहाता ही भेट अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी  ठरली होती.

लोकसभेमध्ये 8 खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 10 जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागेवर विजय मिळवता आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागा जिंकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून त्यांनी आपली मते शरद पवारांसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे.  

Advertisement

नक्की वाचा: राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 4 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडावे असा मतप्रवाह तयार झाला आहे. मात्र बाहेर पडून नेमकं कोणासोबत जावे यावरून मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांसोबतच राहिलेल्या जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यासारख्या नेत्यांनी सातत्याने अजित पवारांविरोधात भूमिका मांडत कडक शब्दात टीका केली आहे. या नेत्यांव्यतिरिक्त इतर नेत्यांमधील काहींनी अजित पवार हेच शरद पवारांचा वारसा पुढे चालवू शकतात असे मत मांडले आहे. अजित पवारांनी राज्यातील राजकारण सांभाळावे आणि सुप्रिया सुळेंनी देशातील राजकारण सांभाळावे असे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण अजित पवारांसोबत जावे असे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

Advertisement

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसरा मतप्रवाह हा अजित पवारांसोबत न जाता एनडीएला पूरक भूमिका घ्यावी. सत्तेत थेट सहभाग घेण्याऐवजी जिथे एनडीएला मदत लागेल तिथे मदत करावी आणि त्याबदल्यात विकास निधी आणि इतर गोष्टीत सहकार्य मिळवावे असे 'अजित पवारांसोबत जाऊ नये' असे मत असणाऱ्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे कळते आहे.  

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मध्ये सामील व्हावे असा आहे. असे केल्याने शरद पवारांनी पुतण्यापुढे नमते घेतले असा संदेश जाणार नाही असे या नेत्यांना वाटते आहे. आपण सत्तेमध्ये सहभागी झाले पाहीजे असा बहुतांश नेत्यांचा आग्रह असल्याचे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार कळते आहे. त्यानुसार एनडीएमध्ये सामील झाल्यास सत्तेचा लाभही होईल आणि अजित पवारांसोबत कोणती तडजोडही करावी लागणार नाही असे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

केंद्रातील इंडिया आघाडीमध्ये बऱ्याच मुद्दांवरून मतभेद सुरू झाले आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस एकच मुद्दा रेटून धरत लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणत आहे. समाजवादी पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांना हे अजिबात पटलेले नाही. लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेला संविधानाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभावी ठरला नाही. लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे उचलून धरण्याऐवजी काँग्रेस निरर्थक मुद्दे उचलून धरण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसच्या मित्र  पक्षांचे म्हणणे आहे.

हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस जे मुद्दे उचलून धरत आहे, ते आम्हाला विश्वासात न घेता परस्पर ठरवत असल्याबद्दलही इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.  विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील सगळ्या घटक पक्षांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. मात्र ईव्हीएमप्रश्नी जर सुप्रीम कोर्टात जावे लागले तर पक्ष म्हणून आम्ही दाद मागणार नाही, कोणाला दाद मागायची असेल तर ती वैयक्तिक पातळीवर मागावी अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे कळते आहे.

( नक्की वाचा : '.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट )