प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
नदीवर पूल नसल्याने नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरवाण गावातील ही स्थिती आहे. विद्यार्थ्यी, महिला, वयोवृद्ध यांना या प्रवाहाच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोरवाण गावात नदीला पूल नसल्याने येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे वाहत्या पाण्यामुळे एखादा अनुचित प्रकार देखील घडू शकतो.
(नक्की वाचा - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले)
मात्र या गावांना जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून आदिवासी बांधव प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आलेला आहे. पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पुल बांधणीला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहेत.
(नक्की वाचा- पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?)
नदीला मोठा पूर आला तर त्या परिसरातील दहा गावांच्या संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्याच्या देखील समस्या समोर येत असतात. अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.