विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, बारावा उमेदवार देण्याची गरज होती असं वाटतं नाही. 11 उमेदवार असते तर आता बिनविरोध ही निवडणूक झाली असती.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक पार पडत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र बारावा उमेदवार देण्याची गरज नव्हती, असं म्हणज काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, बारावा उमेदवार देण्याची गरज होती असं वाटतं नाही. 11 उमेदवार असते तर आता बिनविरोध ही निवडणूक झाली असती, जे बरं झालं असतं. पण आता तो निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे, त्यामुळे बोलून काही होणार नाही. 

आम्हाला खात्री आहे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. आमच्याकडे आमची मते, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची मते आहेत. त्यामुळे आमचे उमेदवार निवडून येतील. मात्र तरीही ज्यादा उमेदवार देण्याची गरज खरं तर नव्हती, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली आहे. 

(नक्की वाचा- हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?)

कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात?

विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे.  

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

(नक्की वाचा - Monsoon session Maharashtra : विधान परिषद सभापती निवडणूक तूर्तास नाही? )

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर

Topics mentioned in this article