जाहिरात

Laxman Hake On Manoj Jarange: काडीपेटीचा ज्वालामुखी! मनोज जरांगेंवर निशाणा, हाके भडकले

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. 

Laxman Hake On Manoj Jarange: काडीपेटीचा ज्वालामुखी! मनोज जरांगेंवर निशाणा, हाके भडकले

Laxman Hake On Maratha Reservation Protest Mumbai:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मराठा आंदोलनावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. 

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

"लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे. जरांगेसारख्या काडीपेटीचा ज्वालामुखी करण्याचे काम सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे. जरांगेंना मी दोष देत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, आता फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सांगत आहेत. आम्ही १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र जरांगे पाटलाच्या काडीपेटीला ओबीसीमधूनच आरक्षण का पाहिजे? ही बेकायदा मागणी आहे. आधीच ५८ लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षण संपवले आहे. याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत," अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे.

Mumbai Morcha LIVE: आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला पोहचले

"मनोज जरांगे हिटलर, हुकूमशहा आहेत का? ते न्यायालयाचा आदेश मानायला तयार नाहीत. हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेंनी मुंबईकडे येतानाच हा राजकीय अजेंडा असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांसह अजित पवारांचे आमदारही सामील आहेत. जरांगे पाटलांच्या चेहऱ्याआडून हे सरकार बदलण्याचा, अस्वस्थ करण्याचा डाव आहे," असंही लक्ष्मण हाके म्हणाले. 

दरम्यान, "ज्या ज्या नेत्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा आहे त्यांना माझा प्रश्न आहे. ओबीसी आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे? सत्ताधारी पक्षांचाही मनोज जरांगेंना पाठिंबा आहे. अजित पवारांचे आमदार समर्थन करतात. ते त्यांना अडवत नाहीत. मनोज जरांगेंसारख्या फुळचट माणसाला पायघड्या घालत असतील तर आम्हीही संघर्ष यात्रा काढू, सरकारला जी भाषा करते त्यासाठी सज्ज व्हावे लागेल.  उद्या आम्ही बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करु. आम्ही ५० टक्के एकत्र आले तर तुमचे काय होईल?" असा थेट इशाराही त्यांनी दिला. 

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे मुंबईत! शहरातील 'हे' रस्ते पूर्णपणे बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com