जाहिरात

OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप

 OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी लातूरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे.

OBC Reservation: 'आमच्या हक्काचे आरक्षण...' लातूरमधील OBC तरुणाने आयुष्य संपवले, सरकारवर गंभीर आरोप
Latur News : लातूर जिल्ह्यातल्या भरत कराड या 35 वर्षांच्या तरुणानं टोकाचा निर्णय घेतला.
लातूर:

विष्णू बुरगे, प्रतिनिधी

 OBC Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादामुळे ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. राज्यातील ओबीसी नेते या विषयावर आक्रमक झाले आहेत. फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तर मराठा आरक्षणासाठी काढलेला 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल', असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. हा वाद चिघळलेला असतानाच  लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली आहे.

चिठ्ठीमध्ये काय सांगितलं?

भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कराड यांनी यापूर्वीही ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भरत कराड हे शेती व्यवसाय करत होते आणि समाजातल्या प्रश्नांवर त्यांची नेहमीच स्पष्ट भूमिका होती. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वांगदरी गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांच्या मते, आरक्षणावरील अन्याय सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

( नक्की वाचा : Chagan Bhujbal : 'GR मागे घ्या अन्यथा अराजकता माजेल'; मराठा आरक्षणावरून भुजबळांचा आपल्याच सरकारला इशारा )
 

या प्रकारची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मांजरा नदीपात्रातून भरत कराड यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 

भुजबळांनी केलं आवाहन

दरम्यान, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कुणीही घेऊ नये, असं आवाह त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केलं. आत्महत्या करु नका, असं आवाहन भुजबळांनी केलं आपण कायद्यानं लढतोय. शांततापूर्ण वातावरणात मोर्चे काढतोय. आमच्या आंदोलनात सामील व्हा, धीर सोडू नका, असंही भुजबळांनी सांगितलं. 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com