जाहिरात
Story ProgressBack

एसटी बसखाली चिरडून महिला सरपंचाचा मृत्यू, 4 वर्षांचं मूल गंभीर जखमी  

Accident News: पालघरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये महिला सरपंचाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Read Time: 2 min
एसटी बसखाली चिरडून महिला सरपंचाचा मृत्यू, 4 वर्षांचं मूल गंभीर जखमी  

मनोज सातवी/पालघर 
किशोर बेलसरे/नाशिक 

Accident News: पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या रस्ते अपघातात महिला सरपंचाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनल नंदू लोखंडे (वय 27 वर्षे) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. मनोर मुख्य रस्त्यावरील मनोर नाक्यावर राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चाकाखाली आल्याने सोनल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांचा चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहे. सोनल लोखंडे या गोवाडे-नेटाली ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या.  सोनल त्यांच्या चार वर्षांचा मुलगा तनिषसह पतीसोबत गावाकडे येत असताना बाईकचा तोल जाऊन त्या खाली पडल्या आणि समोरून येणाऱ्या बसखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बससह चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.  

वाहतूक कोंडीमुळे अपघात, विद्यार्थिनीचा मृत्यू 

येवल्यामध्येही झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला आहे. येवल्यातील विंचूर चौफुली परिसरातील वाहतूक कोंडीमुळे सोमवारी (15 एप्रिल) झालेल्या अपघातामध्ये भूमिका पटेल (वय 15 वर्ष) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे विंचूर चौफुली परिसरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भूमिका क्लासवरून घरी परतत असताना विंचूर चौफुली येथे तिचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुर्घटनेत भूमिकाचा जागीच मृत्यू झाला. भूमिका मनमाडच्या दिशेने प्रवास करत होती, यावेळेस टँकरने तिला बसस्थानकापर्यंत फरफटत नेले. दरम्यान दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या चालकाचा स्थानिकांनी पाठलाग करून सावरगाव येथे टँकर अडवला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. येवला शहर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. 

आणखी वाचा

लेकीच्या अपहरणानंतर बापाचा प्रताप उघड; सूड उगवण्यासाठी घरातील बांगलादेशी मुलीने रचला कट

सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी

सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination