जाहिरात

Pandharpur News: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. 

Pandharpur News: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू

संकेत कुलकर्णी, पंढरपूर
       
दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दिनांक 27 जून रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

(नक्की वाचा-  Wari News: 21 वर्षांची परंपरा! मुस्लिम बांधवांकडून संत बिहाणी पालखीला पहिली महापंगत)

श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. 

विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू झाल्यानंतर मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच टोकन दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बुकिंगही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वारकरी भक्तांना आता सहज आणि सुलभ दर्शन मिळेल. प्रति मिनिटाला 35 भाविक दर्शन घेतील असे नियोजन मंदिर समितीने केले आहे. तर 50 हजार भाविक चरण स्पर्श दर्शन रांगेत उभा राहतील. अशा पद्धतीने दर्शन रांगेची व्यवस्था ही निर्माण करण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Pandharpur Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान, वारकऱ्यांची तुडूंब गर्दी)

महिला वारकऱ्यांसाठी 'सुविधा' अँड्रॉइड ॲप

पंढरपूर वारीच्या वाटेवर महिला वारकरी भक्तांसाठी आता महिला आयोगातर्फे नवीन अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला वारकरी भक्तांना स्वच्छतागृह , हिरकणी कक्ष आणि सॅनेटरी नॅपकिन स्टॉल कुठे आहेत? याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरच्या वारीवर आवश्यकता सर्व सुविधा दिल्या जात आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com